मराठी बातम्या /बातम्या /देश /कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या भेटीगाठी सुरुच, अमित शहा यांच्या भेटीनंतर आता घेतली या बड्या व्यक्तीची भेट

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या भेटीगाठी सुरुच, अमित शहा यांच्या भेटीनंतर आता घेतली या बड्या व्यक्तीची भेट

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Former Punjab CM Captain Amarinder Singh) यांच्या भेटीगाठी सुरुच आहेत.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Former Punjab CM Captain Amarinder Singh) यांच्या भेटीगाठी सुरुच आहेत.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Former Punjab CM Captain Amarinder Singh) यांच्या भेटीगाठी सुरुच आहेत.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Former Punjab CM Captain Amarinder Singh) यांच्या भेटीगाठी सुरुच आहेत. काल केंद्रीय मंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्यानंतर आज कॅप्टन सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (National Security Advisor Ajit Doval) यांची भेट घेतली आहे. न्यूज 18 चे रिपोर्टर यतेंद्र शर्मा यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. यतेंद्र शर्मा म्हणाले की, पंजाबमधील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन ही बैठक महत्त्वाची मानली जाते. काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी अजित डोवाल यांची भेट घेतली.

राजीनामा दिल्यानंतर सिंह यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पंजाबमध्ये राजकीय अस्थिरता सुरू असताना सिंह यांनी डोवाल यांच्याशी ही बैठक केली.

हेही वाचा- उद्यापासून 'या' राज्यात दारुची दुकानं बंद...बंद...बंद

काल घेतली अमित शहांची भेट

बुधवारी अमरिंदर सिंह (Ex CM of Punjab Amarinder Singh meets Amit Shah in Delhi) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. अमरिंदर सिंह काँग्रेसमध्ये (Talks of Amarinder Singh to join BJP) नाराज असून लवकरच भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना या भेटीमुळे पुन्हा उधाण आलं आहे. मात्र, अमरिंदर सिंह यांचा दिल्ली दौरा (Personal reason) हा वैयक्तिक कारणांसाठी असून ते आपल्या दिल्लीतील निवडक मित्रांना भेटणार असल्याचं त्यांच्या प्रसिद्धी प्रमुखांकडून सांगण्यात आलं.

हेही वाचा- T20 World Cup: पाकिस्तान क्रिकेटला 24 तासांमध्ये 2 धक्के, नव्या अध्यक्षांची डोकेदुखी वाढली

मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर भाजप प्रवेशाची चर्चा

पंजाबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या वादानंतर अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. काँग्रेसनं चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. मुख्यमंत्रीपदानंतर आता अमरिंदर सिंह काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे.

First published:

Tags: Ajit doval, Amit Shah, Punjab, काँग्रेस