• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Avalanche in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात मुंबईतील नौदलाच्या 4 जवानांचा बळी

Avalanche in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात मुंबईतील नौदलाच्या 4 जवानांचा बळी

मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 20 सदस्यांची टीमनं 3 सप्टेंबर 2021 रोजी मुंबईहून मोहिमेला सुरुवात केली

 • Share this:
  उत्तराखंड, 02 ऑक्टोबर:  उत्तराखंडमध्ये हिमस्खलन (Avalanche in Uttarakhand) झाल्याची घटना घडली आहे. या हिमस्खलनामध्ये मुंबईतून (Mumbai) गिर्यारोहणासाठी गेलेले नौदलाचे पाच जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी चार जणांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे.  माऊंट त्रिशूलवर (Mount Trishul) गिर्यारोहण करत असताना ही घटना घडली आहे. उत्तराखंडमध्ये झालेल्या या हिमस्खलनात भारतीय नौदलाचे 10 जवान बेपत्ता झाले आहेत. सध्या त्यांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. हे 20 जवान गिर्यारोहण करण्यासाठी माऊंट त्रिशूलवर जात होते. मात्र वाटेतच हा अपघात झाला. संध्याकाळी शोधमोहिमेअंती चार जणांचे मृतदेह हाती लागले आहे.   लेफ्टनंट कमांडर रजनीकांत यादव, लेफ्टनंट कमांडर योगेश तिवारी, लेफ्टनंट कमांडर अनंत कुकरेती आणि हरी ओम MCPO II अशी चौघांची नाव आहे. हे चारही जवान मुंबईतून उत्तराखंडला गेले होते. मोठी बातमी! सरकारकडून Retrospective Tax मागे घटनेची माहिती मिळताच उत्तरकाशी नेहरू गिर्यारोहण संस्थेचे प्राचार्य कर्नल अमित बिष्ट यांच्या नेतृत्वाखाली रेस्क्यू ऑपरेशन टीम उत्तरकाशीहून माऊंट त्रिशूलच्या दिशेनं रवाना झाली आहे. ही 20 जणांची टीम 7,120 मीटर उंच माऊंट त्रिशूलवर गिर्यारोहणासाठी गेली होती. कुमाऊंमधील बागेश्वर जिल्ह्यातील चमोली जिल्ह्याच्या सीमेवर माऊंट त्रिशूल आहे. हेलिकॉप्टर, लष्कर, हवाई दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि ग्राउंड रेस्क्यू टीम सध्या शोध मोहिम राबवत आहे. IPL 2021 : लखपती बॉलर पडतायत बड्या टीमवर भारी, करोडपती मात्र नावालाच 'मोठे'! असे सांगितले जात आहे की, शुक्रवारी सकाळी, टीम माऊंटसाठी पुढे निघाली आणि या दरम्यान जबरदस्त हिमस्खलन झालं. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे प्राचार्य अमित बिष्ट म्हणाले की, ही घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली, ज्यात 10 नौदल गिर्यारोहक बेपत्ता आहेत. गिर्यारोहण मोहिमेसाठी टीम मुंबईहून रवाना झाली होती मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 20 सदस्यांची टीमनं 3 सप्टेंबर 2021 रोजी मुंबईहून मोहिमेला सुरुवात केली. सकाळी 10 जवान मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यासाठी पुढे गेले. पण वाटेत ते हिमस्खलनाचे बळी ठरले.
  Published by:sachin Salve
  First published: