मुंबई 17 जून : सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme Protest) देशभरातून होत असलेला विरोध अधिकच तीव्र झाला आहे. गुरूवारी उत्तर भारतामध्ये सुरू झालेल्या या विरोधाचे लोण आता दक्षिण भारतापर्यंतही पसरले आहेत. अशात आता बिहारमधून एक बातमी समोर आली आहे. यात बिहारमधील सासाराम आणि भुभुआ स्थानकांदरम्यान अग्निपथ योजनेविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी हावडाहून निघालेल्या यूपी मुंबई मेलवर हल्ला केला आहे (Attack on Mumbai Mail by Agnipath Scheme Protesters). देशभरातून होणाऱ्या विरोधानंतर सरकारचा मोठा निर्णय, अग्निपथ योजनेसाठीची वयोमर्यादा वाढवली हल्लेखोरांनी दगडफेक करून लाठ्या-काठ्या आणि बंदुकांनी गाडीवर हल्ला केला. यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी सीटच्या खाली आसरा घेतला. ट्रेनमध्ये बसलेल्या प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओही शूट केला आहे. यामध्ये रेल्वे रूळाच्या जवळ उभा असलेले काही लोक प्रवाशांनी भरलेल्या ट्रेनवर दगडफेक करताना दिसत आहेत. या हल्ल्यात ट्रेनच्या काचाही फुटल्या आहेत, तर प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी सीटखाली बसल्याचं पाहायला मिळतं.
अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलकांचा मुंबई मेलवर दगडांनी हल्ला; प्रवाशांच्या जीवाशी खेळ, Live Video pic.twitter.com/9duPkC0pes
— News18Lokmat (@News18lokmat) June 17, 2022
दरम्यान, केंद्र सरकारने आता तरुणांचा राग शांत करण्यासाठी भरतीच्या वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही सवलत केवळ एक वेळसाठी असेल आणि त्यानंतर अग्निपथ योजनेच्या वयोमर्यादेनुसार भरती होईल अग्निपथ योजनेला विरोध चिघळला, पोलीस गोळीबारात एकाचा मृत्यू, Live Video संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितलं की, कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून तिन्ही सेवांमधील भरती थांबवण्यात आली होती. त्यामुळे तयारी करताना अनेक तरुण ओव्हरएज झाले. आता अशा तरुणांना दिलासा देण्यासाठी सरकारने त्यांना वयात एकदा सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या, नवीन अग्निपथ योजनेत भरतीसाठी सरकारने वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 21 वर्षे निश्चित केली आहे. परंतु लवकरच सुरू होणाऱ्या तीन सेवांच्या पहिल्या भरतीमध्ये 23 वर्षांपर्यंतचे तरुणही अर्ज करू शकतील (Govt Raises Age Limit to Agnipath Scheme).