मुंबई, 17 जून : सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme Protest) असलेला विरोध अधिक तीव्र बनला आहे. गुरूवारी उत्तर भारतामध्ये सुरू झालेल्या या विरोधाचे लोण आता दक्षिण भारतामध्येही पसरले आहे. तेलंगणा राज्यातही या योजनेच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. तेलंगणामधील सिकंदरबाद रेल्वे स्टेशनवर ( Secunderabad Railway Station) आंदोलनकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. संतप्त आंदोलनकांनी यावेळी रेल्वे स्टेशनचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. त्यांनी स्टेशनवरील पार्सल ऑफिसची तोडफोड केली. तसंच स्टॉलही लुटले. या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर अग्निपथ योजनेच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं pic.twitter.com/J59Kydo30t
— News18Lokmat (@News18lokmat) June 17, 2022
हैदराबाद स्टेशन बंद हैदराबादमधील नामपल्ली स्टेशन खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आले आहे. कोणत्याही प्रवाशांनी बाहेर येऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. वारंगळ-सिकंदराबाद-हैदराबाद रेल्वे वारंगळ स्टेशनवरच थांबवण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी काझीपेठ रेल्वे स्टेशनची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उत्तर भारतामध्येही आंदोलन बिहारमध्ये शुक्रवारी सकाळपासून अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी आंदोनल सुरू झालं. लखीसराय स्टेशनवर मोठ्या प्रमाणात तरूण जमा झाले होते. त्यांनी या स्टेशनची तोडफोड केली. हिंसक आंदोलकांनी दिल्ली-भागलपूर दरम्यानच्या विक्रमशीला सुपरफास्ट ट्रेनला आग लावली. या आगीत अनेक बोगी जळाल्या. त्याचबरोबर रेल्वे प्लॅटफॉर्मची तोडफोड केली. धरमपूरजवळ संपर्क क्रांती सुपर फास्ट ट्रेनमध्येही आग लावण्यात आली. ही रेल्वे अडवून अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. Agnipath Scheme Protest: बिहारमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला, दक्षिण भारतामध्येही भडका, पाहा VIDEO केंद्र सरकारने आता तरुणांचा राग शांत करण्यासाठी भरतीच्या वयोमर्यादेत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही सवलत केवळ एक वेळसाठी असेल आणि त्यानंतर अग्निपथ योजनेच्या वयोमर्यादेनुसार भरती होईल. सध्या, नवीन अग्निपथ योजनेत भरतीसाठी सरकारने वयोमर्यादा 17.5 वर्षे ते 21 वर्षे निश्चित केली आहे. परंतु लवकरच सुरू होणाऱ्या तीन सेवांच्या पहिल्या भरतीमध्ये 23 वर्षांपर्यंतचे तरुणही अर्ज करू शकतील.