मराठी बातम्या /बातम्या /देश /

भयंकर! शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याची निर्घृण हत्या; हल्लेखोरांनी गळा चिरून पळवलं मुंडकं

भयंकर! शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याची निर्घृण हत्या; हल्लेखोरांनी गळा चिरून पळवलं मुंडकं

Murder News: शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याची निर्घृण हत्या (Farmer Brutal murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी शेतकऱ्याचा गळा चिरून (Slit throat) मुंडक गायब केलं आहे.

  • Published by:  News18 Desk

जबलपूर, 01 डिसेंबर: शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याची निर्घृण हत्या (Farmer Brutal murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरीनी शेतात काम करणाऱ्या एकट्या शेतकऱ्यावर सशस्त्र हल्ला केला होता. धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत. तर हल्लेखोरांनी क्रूरतेच्या परिसीमा गाठत शेतकऱ्याचा गळा चिरून (Slit throat) मुंडक गायब केलं आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्याच्या तिलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परसिया गावातील आहे. तर गया प्रसाद असं हत्या झालेल्या 60 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. मृत शेतकरी गया प्रसाद सोमवारी नेहमी प्रमाणे आपल्या शेतात कामाला गेले होते. सोमवारी दुपारी शेतात काम करत असताना, अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला आहे. हल्लेखोरानं अमानुषने शेतकऱ्यावर अनेक वार केले आहेत.

हेही वाचा-'मुलीला आणतोय, दारूची व्यवस्था कर', एका फोन कॉलमुळे अपहरणकर्त्यांचा प्लॅन फसला

क्रूरतेचा कळस म्हणजे आरोपींनी मृत शेतकऱ्याचा गळा कापून त्याचं मुंडकं पळवलं आहे. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तिलवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी शेतकऱ्याची केलेली अवस्था पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा-जळगाव हादरलं! वृद्ध वडील जीवाच्या आकांताने ओरडत होते अन् मुलगा घाव घालत राहिला

हल्लेखारोंनी नेमक्या कोणत्या कारणातून गया प्रसाद यांची हत्या केली, याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांना मिळाली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त केला आहे. 60 वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याची अशाप्रकारे निर्घृण हत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Madhya pradesh, Murder