रावेर, 01 डिसेंबर: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर याठिकाणी एका तरुणानं आपल्या जन्मदात्या वयोवृद्ध पित्याची निर्घृण हत्या (Brutal murder of father by son) केली आहे. वयोवृद्ध वडिलांनी आपल्या आवडीचं जेवण बनवल नसल्याच्या कारणातून मुलानं राक्षसी कृत्य केलं आहे. आरोपीनं वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण (Son beat father) करत त्यांचा जीव घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर, पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक (Accused son arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास रावेर पोलीस करत आहेत.
अनाज्या बारेला असं हत्या झालेल्या वयोवृद्ध पित्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी 24 वर्षीय आरोपी मुलगा दिनेश बारेला याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर येथील पाल शिवारात मृत अनाज्या बारेला हे आपल्या वृद्ध पत्नीसह मुलगा दिनेश आणि त्याच्या तीन लहान मुलांसोबत राहत होते. येथील एका झोपडीत हे कुटुंब वास्तव्याला होतं. आरोपी दिनेश याची पत्नी दोन वर्षांपूर्वी सोडचिठ्ठी जेऊन माहेरी निघून गेली आहे.
हेही वाचा-लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीकडे प्रेम व्यक्त करणं हा लैंगिक छळ? कोर्टाचा निकाल
त्यामुळे दिनेश आणि त्याच्या तीन मुलाचं पालनपोषण हे वृद्ध दाम्पत्य करत होतं. दरम्यान, मृत अनाज्या बारेला यांच्या वृद्ध पत्नी गीताबाई यांचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्या घरातील स्वयंपाक करू शकत नव्हत्या. त्यामुळे 75 वर्षीय वडील अनाज्या बारे यांनी ऐन दुपारी चूल पेटवून आपल्या मुलासाठी आणि नातवांसाठी स्वयंपाक केला होता. दुपारी चारच्या सुमारास आरोपी दिनेश याने आपल्या वडिलांकडे जेवणासाठी काय बनवलं अशी विचारणा केली.
हेही वाचा-Sangli: पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेसोबत झाला घात; कालव्याशेजारी आढळला मृतदेह
यावेळी वडिलांनी उडदाच्या डाळीची भाजी आणि भाकरी केल्याचं सांगितलं, हे ऐकूनच दिनेशचा संताप अनावर झाला. त्याने जन्मदात्या वयोवृद्ध वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. वडील जीवाच्या आकांताने ओरडत असताना, आरोपी दिनेश याने खाटेच्या माचेच्या लाकडाने वडिलांना बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी भयानक होती की, अनाज्या यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रावेर पोलिसांनी आरोपी मुलगा दिनेश याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Jalgaon, Murder