अमरावती, 01 डिसेंबर: अमरावती (Amravti) जिल्ह्याच्या तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका बसस्थानकावर उभ्या असलेल्या 27 वर्षीय तरुणीचं अपहरण (27 year old woman kidnapped) करून तिच्यावर बलात्कार (Rape) करण्याचा प्लॅन फसला आहे. अपहरण झालेल्या तरुणीनं वेळीच आपली सुटका करून घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक (Kidnapper arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. रोशन विनायक रोहनकर असं अटक करण्यात आलेल्या 30 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी तरुणाने यवतमाळपासून देवगाव पर्यंत पीडित तरुणीचा पाठलाग केला होता. त्यानंतर त्याने पीडितेचं अपहरण देखील केलं होतं. पण पीडितेच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय पीडित तरुणी आपल्या कार्यालयातील सहकाऱ्याच्या लग्नासाठी चांदूर रेल्वे याठिकाणी जायला निघाली होती. हेही वाचा- लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीकडे प्रेम व्यक्त करणं हा लैंगिक छळ? कोर्टाचा निकाल 28 नोव्हेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास पीडित तरुणी देवगाव बस स्टॅन्डवरील एका हॉटेलजवळ उभी होती. त्यावेळी पाठलाग करत रोशन हा यवतमाळहून देवगाव येथे आला. त्याने पीडित तरुणीचं अपहरण करून तिला जवळच्या एका बारमध्ये घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं एका तरुणाला फोन करून ‘मुलीला आणतोय, दारूची व्यवस्था कर, आपण तिला दारू पाजून तिच्यावर अतिप्रसंग करू’ असं सांगितलं. हेही वाचा- रक्ताचं नातंही विसरले नराधम; दोघा भावांकडून 16 वर्षीय बहिणीवर वारंवार अत्याचार, बीडला हादरवणारी घटना हे संभाषण ऐकल्यानंतर, तरुणीला आरोपीचा सर्व प्लॅन समजला. त्यामुळे सतर्क झालेल्या पीडितेनं त्वरित आपली सुटका करून घेतली. पीडित तरुणी बारच्या मागील दारातून पळून गेली आणि तिने थेट तळेगाव पोलीस ठाणे गाठलं. याप्रकरणी पीडित तरुणीनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना आढळला. यावेळी देखील आरोपीनं पोलिसांसमोर पीडितेकडे शरीर संबंधाची मागणी केली. तसं करू न दिल्यास दगडाने मारहाण करेल, अशी धमकीही आरोपीनं दिली. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.