जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / ठरलं! 'या' महिन्यात कोरोनावर लस मिळणार, 5 कंपन्या ट्रायलसाठी सज्ज

ठरलं! 'या' महिन्यात कोरोनावर लस मिळणार, 5 कंपन्या ट्रायलसाठी सज्ज

तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 25 लाखांच्या वरगेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तर कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 25 लाखांच्या वरगेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

अमेरिकेतील एका कंपनीची चाचणी तर दुसर्‍या फेरीपर्यंत पोहोचली आहे. तर चीनी कंपनी सिनोव्हॅक बायोटेक दावा करते की त्यांची लस 99 टक्के प्रभावी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 05 जून : जगात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. 100 हून अधिक कंपन्या सध्या कोरोना लस तयार करत आहेत. पण आतापर्यंत कोणालाही यश मिळालेलं नाही. दरम्यान, काही कंपन्यांनी चांगली बातमी दिली आहे आणि दावा केला आहे की सुरुवातीच्या काळात त्यांची लस प्रभावी असल्याचं सिद्ध होत आहे. अमेरिकेतील एका कंपनीची चाचणी तर दुसर्‍या फेरीपर्यंत पोहोचली आहे. तर चीनी कंपनी सिनोव्हॅक बायोटेक दावा करते की त्यांची लस 99 टक्के प्रभावी आहे. आता अमेरिकेनं लवकरच कोरोनावर लस मिळणार असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी 5 लसींवर विश्वास दाखवला आहे. अमेरिकेतील प्रशासनानं कोरोना लसीसाठी 5 संभाव्य कंपनींची निवडही केली आहे. न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या माहितीनुसार या कंपन्यांमध्ये मॉडर्ना इंक, एस्ट्राजेनेका पीएलसी, फाइजर इंक, जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि मर्क एंड को इंक या कंपन्यांचा समावेश आहे. सरकारच्या वतीनं सरकारला अतिरिक्त फंडही देण्यात येणार आहे. दरम्यान अद्याप कोणत्याही लसीला किवा औषधाला मान्यता मिळालेली नाही आहे. वाचा- ‘या’ ब्लड ग्रुपला कोरोनाचा सर्वात जास्त धोका, डॉक्टरांचा नवा रिसर्च आला समोर येत्या काही दिवसांत व्हाइट हाऊसच्या वतीनं याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या अमेरिकेतील आरोग्य विभागातील तज्ज्ञ या लसींवर अभ्यास करत आहेत. अमेरिकेनं डिसेंबरपर्यंत कोरोनावर लस मिळेल अशी शक्यता वर्तवली असून जुलैमध्ये या लसींच्या मधल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण केली जाणार आहे. याआधी चीन, इस्राइलनं लसीबाबत दावा केला होता. मात्र पहिल्यांदाच अमेरिकेनं कोरोनावर डिसेंबरपर्यंत लसीचा शोध लावण्याबाबत दावा केला आहे. वाचा- भयंकर! खचाखच भरली मुंबईतील सर्व रुग्णालयं, नवीन रुग्णांसाठी जागाच नाही 1 लाखांपेक्षा जास्त वॉलेंटिअर्स अमेरिकेनं समाविष्ट केलेल्या 5 कंपन्यांची उत्पादन क्षमता चांगली आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर क्लिनिकल ट्रायलही केली जाणार आहे. यासाठी जगभरातून 1 लाख स्वयंसेवकांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, मधल्या टप्प्यातील ट्रायल सुरू करण्यासाठी पहिल्या दोन लसी या मॉडर्ना आणि एस्ट्राजेनेका ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या असू शकतात, अशी माहिती नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थचे प्रमुख डॉ. फ्रान्सिंस कोलिन्स यांनी दिली. वाचा- मुंबईत धक्कादायक प्रकार, पैशांसाठी स्वॅब टेस्ट करून दिले बनावट कोरोना रिपोर्ट

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात