सावधान! टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका, नवा रिसर्च आला समोर

सावधान! टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका, नवा रिसर्च आला समोर

कोरोना विषाणू आणि टक्कल पडण्यातील संबंध समजून घेण्यासाठी दोन अभ्यास करण्यात आले आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 06 जून : टक्कल असलेल्या पुरुषांना इतरांपेक्षा कोरोनाव्हायरस संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, असा दावा एका रिसर्चमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीत केलेल्या या अभ्यासाचे प्रमुख संशोधक प्रोफेसर कार्लोस वॅम्बीयर यांच्या म्हणण्यानुसार, “पुरुषांमधील टक्कल हे कोव्हिड-19 च्या (COVID-19) गंभीर संसर्गासाठी धोकादायक घटक आहे”. जानेवारीत चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अशा प्रकारच्या संशोधनात असे दिसून आले आहे की, कोरोनामुळं मृत्यू होण्याचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांपेक्षा जास्त आहे.

मेट्रो न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणू आणि टक्कल पडण्यातील संबंध समजून घेण्यासाठी दोन अभ्यास करण्यात आले आहे. स्पेनमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, 41 कोरोना रूग्णांवरील संशोधनात असे दिसून आलं आहे की त्यापैकी 71 टक्क्यांहून अधिक पुरुषांना टक्कल होते. ब्राउन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, 122 कोरोना रूग्णांवर संशोधन केलं गेलं होतं, त्यातील 79 टक्के रुग्णांना टक्कल असल्याचं निष्पण्ण झालं.

वाचा-धोका कायम! महाराष्ट्रात एका दिवसांत 139 कोरोनाबाधितांचा मृत्यू तर 2436 नवे रुग्ण

दोन्ही अभ्यासातून केला दावा

संशोधकांच्या मते टक्कल पडणं आणि कोरोनाचा संसर्ग यांच्यात एक विशेष संबंध आहे. संशोधकांचा असा दावा आहे की पुरुषांच्या सेक्स हार्मोन एंड्रोजनमुळे कोरोना विषाणूची लागण होण्याची क्षमता वाढू शकते. अशा हार्मोनमुळे पुरुषांमध्ये औषधांचा प्रभाव कमी होत आहे आणि रुग्ण गंभीर आजारी पडतात.

वाचा-कोरोना हा व्हायरस नाही तर बॅक्टेरिया? 'त्या' व्हायरल व्हिडिओचं FACT CHECK

आणखी एका अभ्यासात केला खुलासा

याआधी करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे म्हटले गेले आहे की पुरुषांच्या रक्तात अशा रेणूंची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे, जी सहजपणे कोरोना विषाणूचे वाहक बनतात. संक्रमित पुरुष आणि स्त्रिया वय आणि संख्या एकसारखीच होती परंतु पुरुषांना अधिक गंभीर आजार होते. शास्त्रज्ञांना असेही आढळले की मृत्यू झालेल्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक पुरुष होते, म्हणजेच पुरुषांचा मृत्यू दर स्त्रियांपेक्षा 2.5 पट इतका असू शकतो.

वाचा-कोरोनाला उंचीची भीती? समुद्रसपाटीपेक्षा डोंगराळ भागात व्हायरसचा प्रभाव कमी

(ही माहिती एका रिसर्चच्या माध्यमातून देण्यात आली आहे. वरील माहितीची पुष्टी न्यूज 18 लोकमत देत नाही)

First published: June 6, 2020, 10:13 AM IST

ताज्या बातम्या