दिल्ली, 7 मार्च: उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. अंतिम टप्प्यातलं मतदान उत्तर प्रदेशात नुकतंच पार पडलं आहे. आता या राज्यांच्या मतदारांनी कोणाला कौल दिला आहे याचा अंदाज थोड्याच वेळात समोर येईल. भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कुठल्याही टप्प्यातील आणि कुठल्याही राज्यातील EXIT Polls जाहीर करता येत नाहीत. ती मुदत आता संपणार आहे. कधी, कुठे आणि कसे पाहता येतील मतदानोत्तर कल चाचणीचे म्हणजेच EXIT Polls 2022 चे निकाल? उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातलं मतदान (UP Assembly election 2022)सोमवारी पार पडलं. मतदानोत्तर कल चाचणीत (Exit Polls 2022)कुठल्या पक्षाचं पारडं जड असेल आणि कोण कुणाला धूर चारेल याचा अंदाज येऊ शकतो. भाजपविरोधात लढून काँग्रेस-राष्ट्रवादीने केला सेनेचा गेम, बँकेवर केला कब्जा! उत्तप प्रदेश विधानसभेच्या 403 जागा, उत्तराखंडच्या 70 जागा, गोवा विधानसभेच्या 40 जागा, पंजाब विधानसभेच्या 117 जादा आणि मणिपूरच्या 60 जागांसाठी मतदारांनी आपला कौल दिला आहे. यापैकी उत्तर प्रदेश विधानसभा आकाराने सर्वांत मोठी. भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशी सरळ लढत तिथे होणं अपेक्षित आहे. भाजपने गेल्या वेळसारखंच 300 चा आकडा पार करण्याचा दावा केला आहे, तर अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सपाने त्यांना कट्टर लढत दिली आहे. भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक सध्या या पाच राज्यांपैकी पंजाब वगळता अन्यत्र उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर इथे भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आहे. आता ही सत्ता अबाधित राहणार की नाही हे गुरुवारी 10 मार्चला निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. तत्पूर्वी या पाच राज्यांमध्ये Assembly election 2022 मतादारांनी कोणाला कौल दिला आहे याचा अंदाज एक्झिट पोल्समधून मिळू शकतो. EXIT POLLS कसे काढतात? एक्झिट पोल्स म्हणजे काय (What are Exit Poll?) तर मतदान करून बाहेर आलेल्या मतदारांना काही प्रश्न विचारून त्यानुसार प्रत्यक्ष निकालाआधी तपासलेला कल. या मतदानोत्तर कल चाचणीचे निकाल प्रत्यक्ष निकालाशी मिळते-जुळते येतातच असं नाही. कारण या कल चाचणीसाठी सर्व्हे करताना वेगवेगळ्या पद्धतीने sample गोळा केली जातात. सिस्टिमॅटिक किंवा रँडम सँपलिंग शास्त्रीय पद्धतीने केलं तर प्रत्यक्ष निकालाच्या जवळ जाणारी माहिती मिळू शकते. भारतीय निवडणूक आयोगाने 7 मार्चला मतदानाचा अखेरचा टप्पा संपेपर्यंत कुठलेही Exit polls जाहीर करण्याला मनाई केली आहे. त्यामुळे सगळ्या एक्झिट पोल्सचे निकाल हे संध्याकाळी 6.30 नंतरच जाहीर होतील. एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या या लिंक वर क्लिक करून मिळेल. चाणक्य, CVoter, MyAxis India अशा संस्थांतर्फे मतदानोत्तर चाचणी घेण्यात येतात. या संस्था विविध माध्यम संस्थांबरोबर हे निकाल जाहीर करतात. News18lokmat वर या सर्व कल चाचण्यांचे निकाल समजून त्याचा गोषवारा Polls of Polls दिला जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.