Home /News /maharashtra /

भाजपविरोधात लढून काँग्रेस-राष्ट्रवादीने केला सेनेचा गेम, बँकेवर केला कब्जा!

भाजपविरोधात लढून काँग्रेस-राष्ट्रवादीने केला सेनेचा गेम, बँकेवर केला कब्जा!


उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून उस्मानाबादेत महा विकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून उस्मानाबादेत महा विकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून उस्मानाबादेत महा विकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे.

उस्मानाबाद, 07 मार्च : राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये (mva government) तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर निवडणुकीसाठी एकत्र येत आहे. मात्र, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Osmanabad District Bank) अध्यक्षपदाच्या निवडीवरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे. शिवसेनेला (shivsena) बाजूला सारत काँग्रेस-राष्ट्रवादीने बँक आपल्या ताब्यात घेतली आहे. यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर यांना धक्का मानला जात आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून उस्मानाबादेत महा विकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. शिवसेनेला बाजूला सारत काँग्रेस-राष्ट्रवादीने बँकेवर आपला झेंडा फडकावला आहे.  मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे बापूराव पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मोठे हे निवडून आले आहेत. बापूराव पाटील यांना 11 मते तर मधुकर मोटे यांना 11 मते पडली असून शिवसेनेचेचे एक मत फुटले असून शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ 4 मते पडली आहेत. (तुमच्या गाडीचा Insurance लगेच करा रिन्यू, एप्रिलपासून मोठ्या बदलाची शक्यता) बँकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून भाजपच्या विरोधात ही निवडणूक लढवली होती. अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडीमध्ये ऐनवेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला बाजूला सारले. (बोर्डाच्या परीक्षेदरम्यान संपूर्ण राज्यात Internet सेवा ठप्प; या राज्याचा निर्णय) एका दिवसांपूर्वीच शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळेसच हा फॉर्म्युला ठरला असल्याची चर्चा असून  शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, ही निवडणूक म्हणजे फूट नसून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रच असल्याची प्रतिक्रिया नुतून अध्यक्ष बापूराव पाटील यांनी दिली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या