मराठी बातम्या /बातम्या /देश /Assembly elections 2021: विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा झटका, ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम

Assembly elections 2021: विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा झटका, ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला रामराम

केरळ काँग्रेसचे (Kerala Assembly Election 2021) ज्येष्ठ नेते पी.सी. चाको (PC Chacko resigns Kerala congress) यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांनी पक्षावर आणि हाय कमांडवरही काय आरोप केलेत वाचा...

केरळ काँग्रेसचे (Kerala Assembly Election 2021) ज्येष्ठ नेते पी.सी. चाको (PC Chacko resigns Kerala congress) यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांनी पक्षावर आणि हाय कमांडवरही काय आरोप केलेत वाचा...

केरळ काँग्रेसचे (Kerala Assembly Election 2021) ज्येष्ठ नेते पी.सी. चाको (PC Chacko resigns Kerala congress) यांनी पक्षाला रामराम केला आहे. त्यांनी पक्षावर आणि हाय कमांडवरही काय आरोप केलेत वाचा...

  aतिरुवनंतरपुरम, 10 मार्च : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे (Assembly election 2021) पडघम वाजू लागले आहेत. पण त्यातल्या एका दाक्षिणात्य राज्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. केरळ काँग्रेसचे (Kerala Assembly Election 2021) ज्येष्ठ नेते पी.सी. चाको (PC Chacko resigns Kerala congress) यांनी पक्षाला रामराम केला आहे. काँग्रेसमध्ये लोकशाही राहिलेली नाही, असं सांगत त्यांनी राजीनाम्याचं पत्र सोनिया गांधी यांच्याकडे दिलं आहे.

  चाको यांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पाठवला आहे. चाको (PC Chacko) यांनी काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचा आरोप केला. पक्षामध्ये आता लोकशाही शिल्लक नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. केरळमधील 140 विधानसभा जागांसाठी 6 एप्रिलला मतदान होणार आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील सध्या केरळमधील खासदार आहेत. डाव्या पक्षांच्या ताब्यातील केरळमधील सत्ता पुन्हा एकदा घेण्यासाठी काँग्रेसने जोरदार कंबर कसलेली आहे. त्यातच वरिष्ठ नेते चाको यांनी पक्ष सोडल्यानं पक्षाला धक्का बसला आहे.

  उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना का द्यावा लागला राजीनामा? वाचा महत्त्वाची कारणं

  चाको यांनी पत्रकार परिषद बोलावाली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. "काँग्रेस हाय कमांड केरळच्या फक्त दोन व्यक्तींच्या सांगण्यावरून निर्णय घेते. पक्षात लोकशाही नाही. विधानसभा निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णयसुद्धा या दोघांनीच घेतला. हाय कमांडने फक्त त्यांनी सांगितलेल्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं", असा सरळ आरोप चाको यांनी केला. "काँग्रेस हाय कमांड फक्त मुक्याने हे सारं पाहात राहते," असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरही हल्लाबोल केला.

  पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपनं मिथुन यांचीच निवड का केली? वाचा कसा होणार फायदा

  "गेले अनेक दिवस पक्ष सोडायचा विचार डोक्यात घोळत होता, असं या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने  आणि माजी खासदाराने सांगितलं. दिवसेंदिवस पक्ष कमजोर होत आहे. माझ्या राजीनाम्याने किमान डोळे उघडले तरी माझा निर्णय सार्थकी लागला, असं मी समजेन", असंही चाको म्हणाले.

  First published:
  top videos

   Tags: Assembly Election 2021, Congress, India, Kerala, Kerala Election