मराठी बातम्या /बातम्या /explainer /

West Bengal Election 2021: भाजपनं मिथुन यांचीच निवड का केली? वाचा कसा होणार फायदा

West Bengal Election 2021: भाजपनं मिथुन यांचीच निवड का केली? वाचा कसा होणार फायदा

पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (West Bengal Election 2021) भाजप मिथुन चक्रवर्ती यांच्या नावाचा कसा फायदा करुन घेणार, याबाबत सध्या चर्चा होत आहे. मिथुन चक्रवर्ती यांचीच निवड भाजपनं का केली? यामागे दोन मोठी कारणं आहेत.

पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (West Bengal Election 2021) भाजप मिथुन चक्रवर्ती यांच्या नावाचा कसा फायदा करुन घेणार, याबाबत सध्या चर्चा होत आहे. मिथुन चक्रवर्ती यांचीच निवड भाजपनं का केली? यामागे दोन मोठी कारणं आहेत.

पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये (West Bengal Election 2021) भाजप मिथुन चक्रवर्ती यांच्या नावाचा कसा फायदा करुन घेणार, याबाबत सध्या चर्चा होत आहे. मिथुन चक्रवर्ती यांचीच निवड भाजपनं का केली? यामागे दोन मोठी कारणं आहेत.

पुढे वाचा ...

कोलकाता 10 मार्च : पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये (Bengal Politics) चित्रपटसृष्टीतील कलकारांचा ओघ जास्त आहे, ही काही नवीन गोष्ट नाही. मुनमुन सेन (Moon Moon Sen), बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांच्याशिवाय जवळपास एक डझन नावं अशी आहेत, जे कलाकार बंगालच्या राजकारणात सक्रिय आहेत. आता या यादीमध्ये बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या नावाचा समावेशही झाला आहे. पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Election 2021) पार्श्वभूमीवर मिथुन चक्रवर्ती यांनी मोठ्या उत्साहात भाजपमध्ये प्रवेश (Mithun Joins BJP) केला. आधीपासूनच बंगालच्या राजकारणात असलेल्या मनोरंजन क्षेत्रातील (Entertainment) इतर नावांपैकी हे नाव खूपच खास आहे. आता या निवडणुकीमध्ये भाजप मिथुन चक्रवर्ती यांच्या नावाचा कसा फायदा करुन घेणार, याबाबत सध्या चर्चा होत आहे.

बंगालच्या निवडणुकीदरम्यान मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी बॉलिवूड (Bollywood) स्टाइलने डायलॉगबाजी करत भाजपमध्ये जबरदस्त एन्ट्री केली. कोलकात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रचारसभेतच बंगाल भाजपनं मिथुन चक्रवर्ती यांना पक्षाचा खास चेहरा बनवून नवीन भूमिका तयार केली आहे. आता या निवडणुकीमध्ये भाजपला मिथुन चक्रवर्ती यांचा कसा फायदा होतो?, मिथुन आणि भाजप यांच्यातील राजकीय सूर कसे जुळतील याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

भाषणात केली डायलॉगबाजी -

कोलकात्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपचा झेंडा हातात घेत सहभाग नोंदवला. या रॅलीदरम्यान त्यांनी जबरदस्त भाषण केलं. 'मी काही सामान्य साप नाही, तर खतरनाक कोब्रा आहे. मी दंश केलेला माणूस पाणीही मागणार नाही.', असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले. भाषणामध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या चित्रपटातील अनेक प्रसिद्ध डायलॉग म्हणून दाखवले.

मिथुन चक्रवर्ती भाषणात म्हणाले की, 'एवढं मारेन की तुझा मृतदेह गाडला जाईल.' मिथुन चक्रवर्ती यांचे डायलॉग राजकारणात जुने झाले आहेत. पण यावेळी ते एका नवीन हेतूनं भाजपच्या खांद्यांला खांदा लावून उभे राहिले आहेत. भाजपने हा डाव का खेळला त्यापूर्वी आपण मिथुन यांचा बंगालच्या राजकारणात कसा हस्तक्षेप राहिल हे जाणून घेऊया.

लेफ्टपासून राईटपर्यंत मिथुन चक्रवर्ती -

मिथुन चक्रवर्ती यांना दिवंगत माजी मंत्री सुभाष चक्रवर्ती यांचे निकटवर्तीय मानलं जात होतं. लेफ्ट फ्रंटच्या सत्तेवेळी मिथुन चक्रवर्ती यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी केली होती. 2014 मध्ये टीएमसीच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयी होत राज्यसभेवर पोहचले होते. मात्र शारदा घोटाळ्यात मिथुन चक्रवर्ती यांचं नाव आलं. त्यानंतर दोन वर्षांतच त्यांनी आरोग्याचं कारण देत राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता मिथुन यांनी सांगितलं की, 'टीएमसीसोबत जाणं हा त्यांचा चुकीचा निर्णय होता आणि त्यांच्यासारखं लोकांनीही सर्व जुन्या गोष्टी विसरुन गेल्या पाहिजे.' गरीबांची मदत करण्यासाठी भाजपमध्ये आल्याचा दावा ते करत आहेत. पण चर्चा काही वेगळ्याच सुरु आहेत.

मिथुन चक्रवर्ती 'बंगालचे पुत्र' -

यावेळी पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या पक्षाविरुद्ध सर्वात मोठा प्रतिस्पर्धी पक्ष भाजप झाला आहे. टीएमसीने एकीकडे ममता बॅनर्जी यांना 'बंगालची कन्या' म्हणून प्रचार सुरु करत भाजपला बाहेरचा पक्ष म्हटलं आहे. इनसाइडर विरुद्ध आउटसाइडर राजकारणामध्ये भाजपनं मिथुन चक्रवर्ती यांना 'बंगालचा पुत्र' म्हणून डाव खेळायला सुरुवात केली आहे.

मिथुन चक्रवर्तीच का? -

मिथुन चक्रवर्ती यांचीच निवड भाजपनं का केली? यामागे दोन मोठी कारणं आहेत. एक तर भाजपची पहिली पसंती माजी क्रिकेटर आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना होती. सौरव गांगुलीला भाजप 'बंगालचा पुत्र' म्हणून पक्षाचा चेहरा बनवू इच्छित होतं. पण गांगुलीने राजकारणात सध्या रस नसल्याचं सांगितलं.

त्यानंतर भाजपनं बंगाली चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता प्रसेनजित चटर्जी यांना आपल्या छावणीत आणण्याचा प्रयत्न केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त व्हिक्टोरिया मेमोरियलमधील पंतप्रधानांच्या कार्यक्रमात चटर्जी सहभागी झाले. पण भाजपचा प्रस्ताव त्यांनीदेखील नाकारला. मिळालेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची मुंबईमध्ये भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची भाजपमध्ये येण्याची भूमिका तयार झाली.

स्टार पॉवर काम करेल का? -

बंगालच्या राजकारणात पाहायला गेलं तर चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रातील अनेक कलाकार आहेत. टीएमसी असो किंवा भाजप तसंच इतर पक्ष कलाकारांना आपल्या पक्षात सहभागी करण्यासाठी प्रयत्न करतात. बॉलिवूड आणि बंगाली नाही तर बांगलादेशी चित्रपटातील अनेक कलाकार बंगालच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाले आहेत. यामध्ये मिथुन चक्रवर्ती यांचं नाव खूपच खास आहे कारण त्यांचं नाव देशभरात प्रसिद्ध आहे आणि त्यांना बंगालमधील मोठा जनसमुदाय ओळखतो. या निवडणुकीतील प्रचार सभेमध्ये मिथुन चक्रवर्ती भाजपसाठी गर्दी जमवतील हे काही सांगायची गरज नाही.

पुन्हा एकदा नंदीग्रामवर लक्ष -

मिथुन चक्रवर्ती यांच्यासाठी नंदीग्राममधील (Nandigram) निवडणूक रॅली काही नवीन गोष्ट नाही. 2014 मध्ये त्यांनी नंदीग्राममध्ये सुवेंदु अधिकारी यांच्यासाठी प्रचार केला होता आणि सुवेंदु यांचा विजय झाला होता. यावेळी नंदीग्रामची जागा खूपच खास झाली आहे कारण टीएमसीमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले सुवेंदु अधिकारी यांच्याविरोधात स्वत: ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे मिथुन चक्रवर्ती यांच्या संपूर्ण स्टार पॉवरचा वापर भाजप याठिकाणी करेल.

First published:

Tags: BJP, India, Mamata banerjee, Mithun chakraborty, TMC, West bengal