मराठी बातम्या /बातम्या /देश /आसामच्या चहाला विक्रमी भाव! 99,999 रुपयांना एक किलो चहा, जाणून घ्या या चहामध्ये काय आहे खास

आसामच्या चहाला विक्रमी भाव! 99,999 रुपयांना एक किलो चहा, जाणून घ्या या चहामध्ये काय आहे खास

Manohari Gold Tea: देशातील कोणत्याही चहाच्या लिलावात मिळालेली ही सर्वोच्च किंमत आहे, अशी एका अधिकाऱ्यानं माहिती दिली. गुवाहाटीतील होलसेल विक्रेते 'सौरभ टी ट्रेडर्स'नं (Saurabh Tea Traders) या चहासाठी बोली लावली होती आणि त्यांनीच ती जिंकली.

Manohari Gold Tea: देशातील कोणत्याही चहाच्या लिलावात मिळालेली ही सर्वोच्च किंमत आहे, अशी एका अधिकाऱ्यानं माहिती दिली. गुवाहाटीतील होलसेल विक्रेते 'सौरभ टी ट्रेडर्स'नं (Saurabh Tea Traders) या चहासाठी बोली लावली होती आणि त्यांनीच ती जिंकली.

Manohari Gold Tea: देशातील कोणत्याही चहाच्या लिलावात मिळालेली ही सर्वोच्च किंमत आहे, अशी एका अधिकाऱ्यानं माहिती दिली. गुवाहाटीतील होलसेल विक्रेते 'सौरभ टी ट्रेडर्स'नं (Saurabh Tea Traders) या चहासाठी बोली लावली होती आणि त्यांनीच ती जिंकली.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 15 डिसेंबर : जगभरातील मोजक्या चहा उत्पादक देशांमध्ये (Tea producing countries) आपल्या देशाचा वरचा क्रमांक लागतो. ईशान्य (North East) भारत आणि दक्षिण भारतातील काही ठिकाणी विविध प्रकारच्या चहाचं उत्पादन घेतलं जातं. त्याठिकाणी मोठे-मोठे चहाचे मळे (Tea Estates) आणि चहा पावडर निर्मितीचे कारखाने आहेत. आपल्या देशात चहाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात असल्यामुळं इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे चहाचे दर कमी आहेत, असा साधारण आपला समज असेल. मात्र, आसाममधील (Assam) दिब्रुगड जिल्ह्यात एका खास प्रकारच्या चहाला 99 हजार 999 रुपये प्रति किलो इतका विक्रमी दर मिळाला आहे. त्याठिकाणी मंगळवारी (14 डिसेंबर 2021) लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती.

  देशातील कोणत्याही चहाच्या लिलावात मिळालेली ही सर्वोच्च किंमत आहे, अशी एका अधिकाऱ्यानं माहिती दिली. गुवाहाटीतील होलसेल विक्रेते 'सौरभ टी ट्रेडर्स'नं (Saurabh Tea Traders) या चहासाठी बोली लावली होती आणि त्यांनीच ती जिंकली.

  वाचा : गायीनं गिळली सोन्याची साखळी; 35 दिवस ठेवली शेणावर नजर तरीही उपयोग नाही, अखेर केलं हे काम

  मनोहरी टी गार्डन या चहा उत्पादकानं 'मनोहरी गोल्ड' (Manohari Gold) या प्रकारचा एक किलो चहा सौरभ टी ट्रेडर्सला 99 हजार 999 रुपयांना विकला. देशातील चहा खरेदी-विक्री लिलावातील ही आतापर्यंतची सर्वोच्च किंमत ठरली आहे, अशी माहिती गुवाहाटी टी ऑक्शन सेंटरचे (GTAC) सचिव प्रियनुज दत्ता (Priyanuj Datta) यांनी दिली.

  चमकदार पिवळा रंग आणि अप्रतिम चव

  मनोहरी टी इस्टेटचे (Manohari Tea Estate) मालक राजन लोहिया म्हणाले की, 'चहाचे ग्राहक आणि जाणकारांच्या मागणीनुसार आम्ही अशा प्रकारचा प्रीमियम दर्जाचा खास चहा तयार करतो. चमकदार पिवळ्या रंगाच्या या चहाला अप्रतिम चव असते. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही (Health Benefits) आहेत.'

  वाचा : ट्रेनमधील फॅनचोरीला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेनं लढवली अनोखी शक्कल

  2019 मध्ये एक किलो चहाला मिळाली होती 50 हजार रुपये किंमत

  जुलै 2019 मध्ये झालेल्या जीटीएसी (GTAC) लिलावात एक किलो मनोहरी गोल्ड टीला 50 हजार रुपये किंमत मिळाली होती. मात्र, हा विक्रम पुढील एका महिन्यातच मोडला गेला होता. अरुणाचल प्रदेशातील डोनी पोलो टी इस्टेटनं (Donyi Polo Tea Estate) उत्पादित केलेला 'गोल्डन नीडल टी' (Golden Needle tea) आणि आसाममधील डायकॉन टी इस्टेटमधील 'गोल्डन बटरफ्लाय टी' (Golden Butterfly tea) जीटीएसीच्या लिलावात 75 हजार रुपये प्रति किलोप्रमाणं विकला गेला होता. आता मनोहरी टी इस्टेटच्या मनोहरी गोल्ड या चहानं सर्व विक्रम मोडून काढले आहेत.

  First published:

  Tags: Assam, Tea