• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • BREAKING : किरण गोसावी लखनऊमधूनही पळाला, पुणे पोलिसांच्या हातातून थोडक्यात निसटला

BREAKING : किरण गोसावी लखनऊमधूनही पळाला, पुणे पोलिसांच्या हातातून थोडक्यात निसटला

किरण गोसावी हा उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) लखनऊमध्ये ( lakhnau) लपून बसला होता पण पुणे पोलीस पोहोचण्याआधीच तो पळून गेला.

किरण गोसावी हा उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) लखनऊमध्ये ( lakhnau) लपून बसला होता पण पुणे पोलीस पोहोचण्याआधीच तो पळून गेला.

किरण गोसावी हा उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) लखनऊमध्ये ( lakhnau) लपून बसला होता पण पुणे पोलीस पोहोचण्याआधीच तो पळून गेला.

  • Share this:
लखनौ, 26 ऑक्टोबर : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (aryan Khan arrest case) अटक प्रकरणी एकीकडे सुनावणी सुरू आहे तर दुसरीकडे फरार असलेला पंच किरण गोसावी (kiran Gosavi) पसार झाल्याचे वृत्तसमोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला किरण गोसावी हा उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) लखनऊ(lucknow) इथं लपून बसला होता. त्याने स्वत: पोलिसांना शरण येणार असं जाहीर ही केलं. पण, पुणे पोलीस लखनौला पोहोचण्याआधीच तो तिथूनही पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.  (kiran Gosavi surrender lucknow police) गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला पंच किरण गोसावीचा मोठ्या मुश्लिलीने त्याचा ठावठिकाणा लागला होता. किरण गोसावी हा उत्तर प्रदेशमधील (uttar pradesh) लखनऊमध्ये ( lakhnau) लपून बसला असल्याचे समोर आले होते. सोमवारी रात्री तो पोलिसांना शरण येणार होता. लखनौ येथील मंडियांव पोलीस आयुक्तालयात तो हजर होणार होता. पण सोमवारी रात्री उशिरापर्यंत तो काही आलाच नाही. पुणे पोलिसांचं पथक पोहोचण्याआधीच गोसावी लखनऊमधून निघून पळून गेल्याची माहिती समोर आली, मोबाईल लोकेशन आता फत्तेफुर सिक्रीला असल्याची पुणे पोलिसांची माहिती आहे. नोव्हेंबर महिन्यात 17 दिवस बंद राहणार बँका, लवकर पूर्ण करा तुमची कामं दरम्यान,त्याआधी किरण गोसावीने क्रुझवर कशा प्रकारे कारवाई केली होती आणि प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांना CNN News 18 शी बोलताना खुलासा केला होता. 'क्रुझवर जेव्हा कारवाई करण्यात आली होती, त्याआधी मला माझ्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार मी एनसीबीला माहिती दिली होती. त्यानंतर क्रुझवर कारवाई करण्यात आली होती. आर्यन खानसोबत जो सेल्फी काढला होता, तो सेल्फी एनसीबीच्या ऑफिसमध्ये काढला नव्हता तर तो क्रुझवर काढला होता, असा दावाही गोसावी याने केला आहे. Apple Shape: सफरचंदाचा आकार का असतो असा? जाणून घ्या मजेशीर Facts त्याचबरोबर प्रभाकर साईल याने 25 कोटींच्या खंडणीचे केले आरोप हे निराधार आहे. मी कोणतीही खंडणी मागितली नाही. शाहरुख खानच्या मॅनेजर पूजा ददलानी यांच्याशी कधीही भेट झाली नाही, त्यामुळे अशी कोणतीही खंडणी मागितली नव्हती, असा दावाही त्याने केला. किरण गोसावीवर 4 गुन्हे दाखल दरम्यान, किरण गोसावीवर आधीच पुण्यात फसवणुकीचे चार गुन्हे दाखल आहे. पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहे. पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर तो फरार आरोपी आहे. मलेशियातील हॉटेलमध्ये नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी याने 3 लाख रूपये उकळल्याचा गुन्हा चिन्मय देशमुख यांनी 2018 साली पुणे पोलिसात दाखल केला होता. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथक तयार केली होती.  त्यामुळे ताब्यात लागल्यानंतर पुणे पोलीस त्याला महाराष्ट्रात आणतील. किरण गोसावीच्या असिस्टंटला अटक तर दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी याच फसवणुकीच्या गुन्हात फरार असलेल्या किरण गोसावीच्या असिस्टंटला पुणे पोलिसांनी अटक केली होती.  शेरबानो कुरेशी असं या महिला असिस्टंटचे नाव आहे. 2018 मध्ये पुण्यातील चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाची मलेशियात नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी आणि शेरबानो कुराशी यांनी तीन लाखांची फसवणूक केली होती.  त्यानंतर 2018 मधे दोघांवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच गुन्हयात पुणे पोलिसांनी शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक केली होती.
Published by:sachin Salve
First published: