• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Apple Shape: सफरचंदाचा आकार का असतो असा? जाणून घ्या मजेशीर Facts

Apple Shape: सफरचंदाचा आकार का असतो असा? जाणून घ्या मजेशीर Facts

आजारी व्यक्तीला तर सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर आवर्जून देतात. आरोग्यासाठी हे फळ विशेष उपयुक्त असतं; मात्र सफरचंदाचा आकार आणि त्याच्या वाढीविषयी हार्वर्ड जॉन ए पॉलसन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अॅप्लाइड सायन्सेसच्या (SEAS) संशोधकांच्या पथकानं सखोल संशोधन केलं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : आरोग्यासाठी दररोज फळांचं (Fruits) सेवन करावं, असा सल्ला तज्ज्ञ, डॉक्टर्स नेहमीच देत असतात. सर्व फळांमध्ये सफरचंदाचं (Apple) महत्त्व निराळं आहे. `दररोज एक सफरचंद खा आणि आजारांना दूर ठेवा` अशी म्हण प्रचलित आहे. दररोज सकाळी एक सफरचंद खाल्ल्यानं आरोग्यविषयक (Health) अनेक फायदे होतात. देशात सफरचंदाचं उत्पादन प्रामुख्यानं जम्मू-काश्मीर, सिमला भागात होतं. या भागात सफरचंदाच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु, आपण जे सफरचंद खातो, त्याचा आकार (Shape) असा वैशिष्ट्यपूर्णच का असतो? असा प्रश्न तुमच्या मनात कधी ना कधी आलाच असेल. सामान्यतः सफरचंद गोल आणि हार्ट शेपमध्ये (Heart shape) असतं. वैज्ञानिकांनाही सफरचंदाच्या आकारमानाविषयी प्रश्न पडल्यानं त्यांनी याविषयी सखोल संशोधन केलं. या संशोधनातून अनेक मनोरंजक बाबी स्पष्ट झाल्या आहेत. याविषयीची माहिती `झी न्यूज हिंदी`ने दिली आहे. सफरचंद हे सर्वच वयोगटातल्या व्यक्तींचं आवडतं फळ. आजारी व्यक्तीला तर सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर आवर्जून देतात. आरोग्यासाठी हे फळ विशेष उपयुक्त असतं; मात्र सफरचंदाचा आकार आणि त्याच्या वाढीविषयी हार्वर्ड जॉन ए पॉलसन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अॅप्लाइड सायन्सेसच्या (SEAS) संशोधकांच्या पथकानं सखोल संशोधन केलं. सफरचंदाचा आकार नीट निरखून पाहिला तर त्याच्या वरील भागात खोलवर एक छिद्र असतं. त्यावर देठ असतो. शास्त्रज्ञांच्या मते हा वरील भाग सफरचंदाच्या आकारमानात मोलाची कामगिरी बजावतो. या संशोधनात गणितीय तत्त्व लक्षात घेऊन सिंग्युलॅरिटी थिअरीचा (Singularity Theory) आधार घेतला गेला आणि त्यानुसार सफरचंदाच्या आकारावर संशोधन केलं गेलं. या संशोधनाकरिता संशोधकांच्या पथकानं पीटरहाउस कॉलेजमधल्या बागेतून वाढीच्या विविध टप्प्यांवर असलेली सफरचंदं जमा केली आणि काही अवधीनंतर सफरचंदाच्या वक्र आकाराच्या वरील बाजूच्या वाढीचा एक नकाशा तयार केला. त्यानंतर सिंग्युलॅरिटी थिअरीचा वापर करून सफरचंदाच्या वरील बाजूस फ्रूट कॉर्टेक्स आणि आवरणाची निर्मिती विविध प्रकारे कशी विस्तारत जाते यावर संशोधन केलं. शेवटच्या टप्प्यात चाचण्यांच्या आधारे सफरचंदावर जेल लावून त्याची वाढ मोजली गेली. हे ही वाचा-चवीला कडू असलेल्या या 5 गोष्टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर; असा करा आहारात समावेश `एसईएएस`मध्ये पोस्टडॉक्टरल फेलो आणि संशोधनाच्या सहलेखिका असलेल्या आदिती चक्रवर्ती यांनी सांगितलं, `जेलच्या माध्यमातून सफरचंदाच्या वरच्या भागाची रचना बदललेली दिसून आली.` या संशोधनादरम्यान संशोधकांना दिसून आलं, की सफरचंदाचा कर्व्ह देठाच्या बाजूनं खाली जातो आणि दुसऱ्या बाजूला परत वरील बाजूस येतो. ही एक खास गोष्ट म्हणता येईल. हार्वर्ड जॉन ए पॉलसन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अॅप्लाइड सायन्सेसमधील भौतिकशास्त्राचे आणि अॅप्लाइड मॅथेमॅटिक्सचे प्राध्यापक, संशोधक आणि वरिष्ठ लेखक एल. महादेवन यांनी सांगितलं, की `जैविक आकार हा बहुतांश वेळा संरचनेमुळे व्यवस्थित होतो, जे केंद्रबिंदू म्हणून काम करत असतात. जिथं विकृती मर्यादित असते तिथं हे केंद्रबिंदू कधीकधी एकेरी रूप धारण करू शकतात.`

  First published: