मराठी बातम्या /बातम्या /देश /

केजरीवालांची आयडिया हिट, मद्य विक्रीतून इतके कोटी तिजोरीत जमा

केजरीवालांची आयडिया हिट, मद्य विक्रीतून इतके कोटी तिजोरीत जमा

दिल्ली सरकारने 4 मे रोजी लॉकडाऊन सुरू होण्याच्या तिसऱ्या टप्प्यात 150  सरकारी दारूचे दुकान उघडण्यास परवानगी दिली होती.

दिल्ली सरकारने 4 मे रोजी लॉकडाऊन सुरू होण्याच्या तिसऱ्या टप्प्यात 150 सरकारी दारूचे दुकान उघडण्यास परवानगी दिली होती.

दिल्ली सरकारने 4 मे रोजी लॉकडाऊन सुरू होण्याच्या तिसऱ्या टप्प्यात 150 सरकारी दारूचे दुकान उघडण्यास परवानगी दिली होती.

नवी दिल्ली, 16 मे :  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकानं बंद ठेवण्यात आली होती. मात्र, लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात अटी शिथील करत मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली. दिल्लीत केजरीवाल सरकारने मद्य विक्रीवर विशेष कर आकारूनही दिल्लीकरांनी कोट्यवधीची दारू रिचवली आहे. दिल्लीकरांनी  दारूची दुकाने उघडल्याच्या दहा दिवसांत 170 कोटी रुपयांची दारू रिचवली असल्याचं आता समोर आलं आहे. दिल्ली सरकारने दारू विक्रीवर विशेष कोरोना फी लादून अतिरिक्त 70 कोटी रुपये कमावले आहेत. गेल्या 4 मे रोजी दिल्लीत दारूचे दुकान उघडली होती. हेही वाचा -बिबट्याच्या जबड्यातून तरुणाच्या सुटकेचा थरार, तुम्ही कधीच न पाहिलेला VIDEO दिल्ली सरकारने 4 मे रोजी लॉकडाऊन सुरू होण्याच्या तिसऱ्या टप्प्यात 150  सरकारी दारूचे दुकान उघडण्यास परवानगी दिली होती. दुसर्‍याच दिवशी दारूच्या जास्तीत जास्त किरकोळ किंमतीवर (एमआरपी) 70 टक्के विशेष कोरोना फी लागू केली. अधिकृत आकडेवारीनुसार, दारूच्या दुकानांवर होणाऱ्या  गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिल्ली सरकारने ई-टोकन प्रणाली लागू केल्यामुळे दारू विक्रीत वाढ होऊ लागली.  लोकांना दुकानातून दारू खरेदीसाठी निश्चित वेळ दिला जात असल्याने दिल्लीकर खुश आहेत. हेही वाचा - 436 किमीचा प्रवास...या फोटोमागची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी गेल्या 9 मे रोजी अल्कोहोलची विक्री सर्वाधिक 18. 23  कोटी रुपये  झाली होती. 8 मे रोजी लोकांनी 15.8 कोटी रुपयांची दारू खरेदी केली. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 4 मे रोजी 5. 18 कोटी रुपयांची दारू विकली गेली, तोपर्यंत ई-टोकन सिस्टम सुरू केली गेली नव्हती. 5  मे रोजी  4.49  कोटी रुपयांची दारू विकली गेली. 13 रोजी दिल्लीकरांना 9. 72  कोटी रुपयांची दारू मिळाली आणि दुसर्‍या दिवशी त्यांनी 7.92  कोटींची विक्री केली.राजधानी दिल्लीत जेव्हा दारूचे दुकान उघडलेली होती त्या दिवशी अनेक दुकानासमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गोंधळ होत असल्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करून दुकाने देखील बंद केली होती. संपादन - सचिन साळवे
First published:

पुढील बातम्या