मराठी बातम्या /बातम्या /देश /मुंबईहून परतलेल्या तरुणींचा बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये गोंधळ, कपडे काढले...मुलाला बाल्कनीतून फेकून देण्याची दिली धमकी

मुंबईहून परतलेल्या तरुणींचा बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये गोंधळ, कपडे काढले...मुलाला बाल्कनीतून फेकून देण्याची दिली धमकी

काही महिलांनी आपले कपडे काढून फेकून दिले व अंतर्वस्त्रात नृत्य करू लागले. जर बिअर दिली नाही तर आणखी गोंधळ घालू अशी धमकी दिली

काही महिलांनी आपले कपडे काढून फेकून दिले व अंतर्वस्त्रात नृत्य करू लागले. जर बिअर दिली नाही तर आणखी गोंधळ घालू अशी धमकी दिली

काही महिलांनी आपले कपडे काढून फेकून दिले व अंतर्वस्त्रात नृत्य करू लागले. जर बिअर दिली नाही तर आणखी गोंधळ घालू अशी धमकी दिली

नवी दिल्ली, 20 मे : मुरादाबादमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविलेल्या बार डान्सरनी मंगळवारी सायंकाळी येथे गोंधळ घातला. त्यांनी येथे बिअरची मागणी करीत सेंटरमध्ये धुडगूस घातला. यामध्ये एका महिलेने तर आपल्या 3 वर्षांच्या मुलाला बाल्कनीत लटकवून खाली फेकून देण्याची धमकी दिली.

हद्द तर तेव्हा झाली जेव्हा काही महिलांनी स्वत:चे कपडे काढण्यास सुरुवात केली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कसेबसे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. एसएसपी अमित पाठक यांनी सांगितले की, एमआयटी क्वारंटाईन सेंटरमध्ये मुंबईतील आदर्श कॉलनीतून परतलेल्या महिलांना ठेवण्यात आले होते. ज्यांनी बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये गोंधळ घातला.

सहाय्यक पोलीस अधीक्षक दीपक भूकर यांनी सांगितले की, मुंबईहून आदर्श कॉलनीहून परतलेल्या 72 लोकांपैकी 3 ते 13 वर्षांमधील 12 मुलं, 40 महिला आणि 20 पुरुष आहेत. मुंबईहून परतल्यानंतर यापैकी 20 जणांची कोरोना चाचणी झाली होती. ज्यापैकी 5 कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

मंगळवारी बाकी सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. एएसपी यांनी सांगितले की, महिला क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्यासाठी तयार नव्हती. कसंबसं त्यांना एमआयटीपर्यंत आणण्यात आले. यानंतर सायंकाळी 5 वाजता या महिलांनी धुडघुस घातला. या महिलांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे बिअरची मागणी केली. विरोध केल्यास एका महिलेने आपल्या 3 वर्षांच्या मुलाला एमआयटी हॉस्टेलमधील बाल्कनीतून खाली लटकवून धमकी दिली. जर बिअर आणून दिली नाही तर ती मुलाला खाली फेकून देईन. यादरम्यान काही महिलांनी आपले कपडे काढून फेकून दिले व अंतर्वस्त्रात नृत्य करू लागले. जर बिअर दिली नाही तर असाच गोंधळ घालून अशी धमकी महिला देत होत्या.

हे वाचा - बापासह सायकलवरुन 1000 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीच्या शिक्षणासाठी सरकारचा

पुण्यातील धक्कादायक घटना! अन्न-पाण्याविना एका 40 वर्षीय ऊसतोड मजुराचा मृत्यू

First published:
top videos

    Tags: Corona virus in india