भयंकर! ठाण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारा अभावी घरातच मृत्यू
भयंकर! ठाण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारा अभावी घरातच मृत्यू
पावसाळ्यात वाढणाऱ्या आर्द्रतेवर तज्ज्ञांची वेगवेगळी मतं आहेत. आयआयटी बॉम्बेच्या म्हणण्यानुसार, वाढत्या आर्द्रतेमुळे कोरोना विषाणू आणखी धोकादायक होईल. तर काही तज्ज्ञांच म्हणणं आहे की, आर्द्रतेमुळे कोरोनाचा संसर्गाचा धोका कमी होईल. खोकल्यामुळे आणि शिंकल्यामुळे थेंब बाहेर पडतात. आर्द्रतेमुळे हे थेंब मोठे होतात आणि खाली पडतात. याचा तसा शरीरावर परिणाम कमी होतो.
तुमच्याकडे पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नाही त्यामुळे तुम्हाला दाखल करून घेता येणार नाही असं सांगितल्याने तो रुग्ण घरी गेला आणि त्याचा मृत्यू झाला.
ठाणे 20 मे: कोरोना रुग्णांवर उपचाराचे मोठ मोठे दावे केले जात असतानाच ठाणे महानगर पालिका हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उपचारासाठी आलेल्या कोरोना रुग्णाला हॉस्पिटल्सनी दाखल करून घेतला नाही. फक्त कागदी घोडे नाचवल्याने त्या रुग्णाचा अखेर घरीच मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं असून प्रशासनाचे सर्व दावे किती पोकळ आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. या घटनेमुळे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील शिवाजीनगर परीसरात खळबळ उडाली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत मंगळवारी ही घटना घडली असुन अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला घेवून ठाणे महानगरपालिकेच्या कळवा हॉस्पिटल मध्ये गेले होते. तेथे फक्त क्वारंटाइन कक्ष असल्याने रुग्णाला तिथे दाखल करून घेतले गेले नाही. तर रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल नसल्याने आणि फक्त पॉझिटिव्ह रुग्णांनाच सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतले जात असल्याने त्या रुग्णाला सिव्हील हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करून घेतले गेले नाही.
रेकॉर्ड ब्रेकिंग घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा मोठे बदल, इथे वाचा बुधवार भाव
आणि अशा परिस्थितीत तो रुग्ण तसाच घरीच गेला. शेवटी काही तासांनी रुग्णांची प्रकृती जास्त बिघडली आणि रुग्णाचा त्याच्या घरीच मृत्यू झाला. मृत्यू नंतर केलेल्या तपासणीत रुग्ण कोरोना बाधीत असल्याचं समोर आल्यानंतर ठाणे मनपाची एकच धावपळ सुरु झाली. कारण गेल्या २४ तासात या रुग्णाला अनेक ठिकाणी फिरवले गेले तसेच जेव्हा रुग्णाचा मृत्यू झाला तेव्हा देखील अनेकजण तेथे आले होते.
कोरोना संक्रमणात अमेरिका जगात टॉप; ट्रम्प म्हणाले, 'ही सन्मानाची बाब'
अशी माहिती समोर आलीये त्यामुळे आता त्या करोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात किती जण आलेत याची माहिती गोळी केली जात आहे. ठाण्यात रोज करोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात अशा घटनांमुळे ठाणे महानगरपालिके कितीही दावे केले तरी अशा घटनांमुळे प्रशासनाचे पितळ उघडले पडले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.