मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पुण्यातील धक्कादायक घटना! अन्न-पाण्याविना एका 40 वर्षीय ऊसतोड मजुराचा मृत्यू

पुण्यातील धक्कादायक घटना! अन्न-पाण्याविना एका 40 वर्षीय ऊसतोड मजुराचा मृत्यू

या मजुराचा मृतदेह रस्त्याशेजारी पडून होता. दुर्गंधी सुटल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली

या मजुराचा मृतदेह रस्त्याशेजारी पडून होता. दुर्गंधी सुटल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली

या मजुराचा मृतदेह रस्त्याशेजारी पडून होता. दुर्गंधी सुटल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली

औरंगाबाद, 20 मे : पुणे (Pune) जिल्ह्यातून पायी प्रवास करीत परभणी येथे जाणाऱ्या एका 40 वर्षीय प्रवासी मजुराचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. अंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी सांगितले की, सोमवारी बीड जिल्ह्यातील धनोरा गावातील पिंटू पवार यांचा मृतदेह त्यांच्या घरापासून साधारण 200 किमी दूर सापडला.

याबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, शवविच्छेदनानुसार आलेल्या माहितीनुसार जास्त वेळ चालणे, भूक आणि शरीरातील पाणी कमी झाल्याने 15 मेच्या जवळपास त्यांचा मृत्यू झाला होता. मृतक परभणी जिल्ह्यातील राहणारे आहेत. ते ऊसाच्या शेतात काम करत होते. मात्र लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ते पुण्यात आपल्या भावाच्या घरी राहण्यासाठी गेले होते.

पिंटू यांनी आपल्या गावी जाण्याचे ठरवले होते. 8 मे रोजी ते पायीच निघाले आणि 14 मे रोजी अहमदनगरला पोहोचले. त्यांच्याकडे मोबाइल फोन नव्हता. त्यामुळे त्यांनी कोणा व्यक्तीच्या फोनवरुन 14 मे रोजी आपल्या घरी संपर्क केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तेथून ते 30 ते 35 किमी चालत धनोरा पोहोचले आणि एका शेडखाली आराम करण्यासाठी थांबले.

सोमवारी तेथून जाणाऱ्यांना दुर्गंध येऊ लागला. त्यावेळी पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की जेव्हा पोलीस घटनास्थळी हजर राहिली तेव्हा पिंटू पवार तेथे मृत अवस्थेत सापडले. शवविच्छेदनानंतर मृतकांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधत धनोरा ग्राम पंचायत आणि पोलिसांनी मृतकावर अंत्यसंस्कार केला.

संबंधित -जुळ्या बहिणी...एकत्र राहूनही एक कोरोना संक्रमित तर दुसरी ठणठणीत; डॉक्टरही हैराण

कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट! Uber पाठोपाठ आता OLA कंपनीची मोठी घोषणा

First published:
top videos

    Tags: Corona virus in india