Home /News /national /

'...पण आमची नियत खोटी नव्हती', अमित शाह यांचं मोठं विधान

'...पण आमची नियत खोटी नव्हती', अमित शाह यांचं मोठं विधान

अमित शाह (Amit Shah) फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (FICCI) 94 व्या वार्षिक संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर भाष्य केलं.

  नवी दिल्ली, 17 डिसेंबर : केंद्र सरकारने (Modi Government) काही दिवसांपूर्वी वादग्रस्त ठरलेले तीनही कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतले. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी एका कार्यक्रमात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. आमचे काही निर्णय चुकले असतील, पण आमची नियत स्वच्छ आहे, असं विधान अमित शाह यांनी केलं आहे. ते फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (FICCI) 94 व्या वार्षिक संमेलनात बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीवर भाष्य केलं. देशातील 130 कोटी नागरिकांना लोकशाहीवर विश्वास आहे, हीच मोदी सरकारची जमेची बाजू आहे, असं शाह यावेळी म्हणाले. तसेच फिक्कीचा देशाच्या विकासात मोठा वाटा असल्यातं त्यांनी म्हटलं.

  'देशात गेल्या सात वर्षात खूप चांगले बदल घडले'

  "देशात गेल्या सात वर्षात खूप चांगले बदल घडले हे आमच्यावर टीका करणारे टीकाकर देखील मानतात. सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. सर्वांसोबत विचार-विनिमय करुनच सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यात आली", असा दावा अमित शाह यांनी केला.

  'भारताच्या इकोनॉमीत वेगात तेजी'

  "कोरोना काळात केंद्र सरकारने अनेक असे निर्णय घेतले ज्या निर्णयांचा नागरिकांना पुढच्या अनेक दिवसांपर्यंत फायदा होणार आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात भारताच्या इकोनॉमीत वेगात तेजी आली आहे. लवकरच देशाच्या आर्थिक दराचे आकडे वाढतील", अशी आशा शाह यांनी व्यक्त केली. हेही वाचा : Bigg Boss 15: अभिजित बिचकुलेनं ओलांडल्या सर्व मर्यादा; घरात उडाला एकच गोंधळ

  'केंद्र सरकारने 80 कोटी जनतेला 5 किलो धान्य नि:शुल्क दिलं'

  "भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने गेल्या पावणे दोन वर्षात देशातील 80 कोटी जनतेला प्रतीव्यक्ती 5 किलो धान्य नि:शुल्क देण्याचं काम केलं आहे. हे खूप मोठं काम आहे. असं काम जगात कुठेही झालेलं नाही", असं अमित शाह म्हणाले. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेची रिकव्हरी तेजीत होत आहे, अशीही भूमिका त्यांनी मांडली. हेही वाचा : OMG! 300 कोटींच्या मेगा शो ची होतेय चर्चा, PHOTO पाहुन तुम्ही व्हाल थक्क

  अमित शाहचं फिक्कीला आवाहन

  "देशाच्या विकासात फिक्कीचं 1927 पासून योगदान आहे. आता ते योगदान आणखी दुप्पट करण्याची संधी आहे. देशाच्या विकासासाठी तुम्ही सर्व एकत्र या. नव्या क्षेत्रांमध्येही तुम्ही या. फिक्की सारखी संघटना जेव्हा पुढे येईल, विविध क्षेत्रात चांगले पाऊल उचलेल तेव्हाच आत्मनिर्भर भारचं लक्ष्य सिद्ध होईल", असं आवाहन अमित शाह यांनी केलं.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या