उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये 300 कोटी रूपयांचा मेगा शो लावण्यात आला आहे. त्यात 50 स्टॉल लावण्यात आले असून हा शो पाहण्यासाठी नागरिकांसह व्यापारी गर्दी करत आहे. पाहा PHOTOS
कोरोनामुळे यापूर्वी दोन वेळा ज्वेलरी प्रदर्शनचं आयोजन करता आलं नव्हतं. मेरठ बुलियन ट्रेडर्स असोसिएशनचे सरचिटणीस विजय आनंद अग्रवाल म्हणाले, की हा मेगा शो शेकडो कोटींचा आहे.
2/ 5
हा ज्वेलरी शो विशेषतः महिला आणि मुलींना आकर्षित करणारा आहे. शोमध्ये दागिन्यांचे अनेक प्रकार आहेत, जे विशेषतः महिलांना आवडतात.
3/ 5
ज्वेलर्सनीही या शोमध्ये त्यांच्या कलात्मकतेचं खास प्रदर्शन केलेलं आहे. जगप्रसिद्ध ज्वेलर्सनीही या शोमध्ये विविध आकर्षक वस्तू सादर केल्या आहेत. यात मोठं चांदीचं ताट सर्वांना आकर्षित करत आहे.
4/ 5
शोमध्ये एक मोठा नेकलेस देखील ठेवण्यात आला आहे. या नेकलेसच्या मध्यभागी एक मोठं पेंडेंट आहे. हा भलामोठा नेकलेस पाहण्यासाठी लोक येत आहे.
5/ 5
हा अनोखा ज्वेलरी शो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. या ठिकाणी लोक दागिन्यांची ऑर्डरही बुक करत आहेत.