अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल; 'तो हो जाए दो-दो हाथ', म्हणत दिलं मोठं आव्हान

अमित शाह यांचा काँग्रेसवर हल्लाबोल; 'तो हो जाए दो-दो हाथ', म्हणत दिलं मोठं आव्हान

अमित शाह यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत दोन्ही युद्ध जिंकण्याच्या उबंरठ्यावर आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जून: पूर्व लद्दाखमधील गलवान खोऱ्यात (Galwan Valley Face off) 15 जूनच्या रात्री भारत (India) आणि चीनच्या (China) जवानांमध्ये हिंसक संघर्ष (India-China Dispute) झाला होता. यात 20 भारतीय जवान शहिद झाले. यावरून विरोधी पक्ष काँग्रेसने मोदी सरकारवर खोचक टीका केली. अनेक आरोपही केले.

हेही वाचा..Mann Ki Baat: भारतावर नजर टाकणाऱ्यांना मिळणार चोख उत्तर - नरेंद्र मोदी

काँग्रेसच्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी प्रतुत्तर दिलं. एवढंच नाही तर काँग्रेसवर हल्लाबोलही केला. अमित शाह यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारत दोन्ही युद्ध जिंकण्याच्या उबंरठ्यावर आहे. भारत कोरोनासोबतच लद्दाखमध्ये नियंत्रण रेषेवर सुरु झालेल्या तनावाचा एकाच वेळी संघर्ष करत आहे.

न्यूज एजन्सी 'एएनआय'ला (ANI) दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, सरकर प्रत्येक मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास तयार आहे. संसद सुरू राहणार आहे. ज्यांना कोणाला भारत-चीन सीमावादावर चर्चा करण्यासाठी यायचं आहे, त्यानं खुशाल यावे. आम्ही चर्चा करण्यात तयार आहे. 1962 पासून आजपर्यंत दोन-दोन हात करण्यासही आम्ही सज्ज आहे, असा शब्दात अमित शाह यांनी काँग्रेसला आव्हान दिलं आहे.

सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास घाबरत नाही. मात्र, देशाचे जवान सीमेवर संघर्ष करत आहे आणि सरकार त्याबाबत ठोस भूमिका घेत असताना असं कोणतंही वक्तव्य करू नये, जेणे करून त्यामुळे पाकिस्तान आणि चीनला आणखी पाठबळ मिळेल, असंही अमित शाह यांनी यावेळी सांगितलं.

कोरोनाबाबत चिंता...

गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं की, मुंबई पाठोपाठ आता देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या वक्तव्याचा खुलासा केला. मनीष सिसोदिया म्हणाले होते, की, दिल्ली 31 जुलैपर्यत कोरोना रुग्णांची संख्या 5.5 लाखांवर पोहोचेल. यामुळे दिल्लीकर मोठ्या दहशतीत वावरत आहे.

या मुद्द्यावर 14 तारखेला याबाबत कॉर्डिनेशनची तातडीची बैठक झाली. त्यामुळे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी केलेल्या वक्तव्यानुसार दिल्लीत परिस्थिती निर्माण होणार नाही, असा दावा अमित शहा यांनी केला.

हेही वाचा..NCP सोडून गेलेल्या नेत्याला झाला कोरोना, PM मोदींनी तब्येतीच्या चौकशीसाठी फोन

दिल्लीत 30 जूनपर्यत कंटेन्मेट झोनमधील प्रत्येक घरात सर्वेक्षण होणार आहे. कोरोना चाचण्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. नंतर दिल्लीत प्रत्येक घरात सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं.

First published: June 28, 2020, 1:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading