Home /News /national /

धक्कादायक प्रकार! रुग्णालयातच मृतदेहाची अदलाबदली, हिंदू परिवारानं केले मुस्लीम महिलेवर अंत्यसंस्कार

धक्कादायक प्रकार! रुग्णालयातच मृतदेहाची अदलाबदली, हिंदू परिवारानं केले मुस्लीम महिलेवर अंत्यसंस्कार

रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाची अदलाबदली झाली.

    नवी दिल्ली, 08 जुलै : देशातील सर्वात मोठे रुग्णालय मानल्या जाणाऱ्या एम्समध्ये (Delhi AIIMS) धक्कादायक प्रकार घडला. रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाची अदलाबदली झाली. यातील एक महिला मुस्लीम असून तिचे पार्थिव हिंदू महिलेच्या कुटुंबाकडे गेले. तर, हिंदू महिलेचे पार्थिव मुस्लीम कुटुंबाकडे. या निष्काळजीपणाची तक्रार मृत महिलेच्या कुटुंबानं दिल्ली पोलिसांत दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुस्लीम महिलेचे नाव अंजुमन आहे. ही महिला बरेलीची रहिवासी होती. 4 जुलै रोजी अंजुमनला तिच्या कुटुंबातील सदस्यांनी एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले. टेस्ट केल्यानंतर त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मात्र 6 जुलै सकाळी 11 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती रुग्णालय प्रशासनाच्या नातेवाईकांना दुपारी अडीच वाजता देण्यात आली. ही माहिती मिळतात कुटुंबीय रुग्णालयात पोहचले. वाचा-औरंगाबादेत शिवसेनेला दुसरा दुख:द धक्का, आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू वाचा-पहिल्यांदाच एका दिवसात झाल्या 2.5 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या कब्रिस्तानमध्ये मृतदेह दफन करण्याची सुरू होती तयारी दिल्लीतील कब्रिस्तानमध्ये मृतदेह दफन करण्याची कुटुंबीय तयारीत होते. जेव्हा एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये कुटुंबाला मृतदेह देण्यात आला तेव्हाच त्यांना मृतहेद बदल्याची शंका आली. कुटुंबीयांनी याबाबत रुग्णालय प्रशासनाला कळवले. रुग्णालय प्रशासनाच्या तपासणीत असे निष्पन्न झाले आहे की, अंजुमन यांचा मृतदेह एका हिंदू कुटुंबाकडे गेला आहे. विशेष म्हणजे हिंदू कुटुंबाने त्यांच्यावर अंत्यसंस्कारही केले. एम्स प्रशासनाचा निष्काळजीपणा अंजुमन यांच्या परिवारानं एम्स प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर कुटुंबिय जेव्हा एम्स प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तेथील सुरक्षा रक्षक आणि बाउन्सर्सनी त्यांना धमकी दिली. दरम्यान, आता एम्स प्रशासनानं सारवासारव करण्यास सुरुवात केली आहे. वाचा-अभिमानास्पद! एका शेतकऱ्याचा मुलगा तयार करतोय पहिली मेड इन इंडिया लस
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या