Home /News /news /

औरंगाबादेत शिवसेनेला दुसरा दुख:द धक्का, आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

औरंगाबादेत शिवसेनेला दुसरा दुख:द धक्का, आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

'धूत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.आज सकाळी 10 वाजता त्यांच्या प्लाझमा थेरपी देण्याचे ठरले होते'

  औरंगाबाद, 08 जुलै : औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  कोरोनामुळे शिवसेनेचे नेते नितीन साळवी यांचे निधन झाले. आता त्यांच्यानंतर आणखी एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरातील पडेगाव परिसरातील नगरसेवक  रावसाहेब आमले यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. आज पहाटे 4 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. रावसाहेब आमले यांच्यावर आज प्लाझमा थेरपी होणार होती. मात्र, थेरपी करण्याआधीच त्यांचा मृत्यू ओढावला. पहिल्यांदाच एका दिवसात झाल्या 2.5 लाखांहून अधिक कोरोना चाचण्या 'आमचे दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक हे सक्रीय होते. कोरोनाच्या परिस्थितीत त्यांनी गरजू लोकांसाठी मदतीचे कार्य केले होते. धूत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.आज सकाळी 10 वाजता त्यांच्या प्लाझमा थेरपी देण्याचे ठरले होते. यासाठी दोन प्लाझमा दान करणारे व्यक्तीही समोर आले होते. पण, त्याआधीच आम्हाला दुख:द बातमी मिळाली, अशी भावना सेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली. मंगळवारीच शिवसेनेचे नगरसेवक नितीन साळवी यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर आणखी एका नगरसेवकाच्या निधनामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. औरंगाबादेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7300 वर दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 67 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 92 पुरूष तर 74 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7300 कोरोनाबाधित आढळले असून  त्यापैकी 3824 रुग्ण बरे झालेले असून 327 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने 3149 जणांवर उपचार सुरू  आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 1003 स्वॅबपैकी आज 166 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: औरंगाबाद, नगरसेवक, शिवसेना

  पुढील बातम्या