Home /News /national /

पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या 72 कुटुंबांना रिपोर्ट्स आल्यानंतर मिळाला दिलासा

पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या 72 कुटुंबांना रिपोर्ट्स आल्यानंतर मिळाला दिलासा

नवी दिल्लीमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

    नवी दिल्ली, 20 एप्रिल : काही दिवसांपूर्वी एका पिझ्झा डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झालेल्या बातमीने खळबळ उडाली होती. एका प्रसिद्ध पिझ्झा कंपनीचा डिलिव्हरी बॉय पॉझिटिव्ह निघाल्यामुळे येथील 72 घरांना क्वारंटाइन करण्यात आले होते. आता या 72 परिवाराचे कोरोना रिपोर्ट आले आहेत. सुदैवाने या डिलिव्हरी बॉयच्या संपर्कात आलेल्या या सर्व कुटुंबाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दक्षिण दिल्लीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की पिझ्झा डिलिव्हरी बॉय बरोबर काम करणार्‍या आणि थेट संपर्कात असलेल्या 16 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर, क्वारंटाइनमध्ये ठेवलेल्या 72 कुटुंबियांनाही दिलासा मिळाला आहे. मात्र डिलिव्हरी बॉयच्या कुटुंबियांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. वाचा-'सील करून संपूर्ण गावाची हत्या करावी, आम्ही नागा साधूंना घेऊन गावाला घेरणार' मालवीय नगर परिसरातील प्रसिद्ध पिझ्झा चेनमधील डिलिव्हरी बॉयची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने दुकानातील त्याच्या 16 सहकाऱ्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले होते. तसेच, ज्या घरांमध्ये त्याने पिझ्झाची डिलिव्हरी केली होती, त्या सर्वांना सेल्फ क्वारंटाइन करण्यास सांगितले होते. पिझ्झा आउटलेटने आता खबरदारीचा उपाय म्हणून ऑर्डर घेणं बंद केलं आहे. वाचा-राज्यात हवामानाचा पुन्हा यू-टर्न, 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा या डिलिव्हरी बॉयनं 15 दिवसात 72 घरांना पिझ्झा दिला होता. मात्र या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने प्रशासनाची चिंता मिटली आहे. मात्र डिलिव्हरी बॉयच्या घरच्यांचे रिपोर्ट अद्याप आलेले नाही आहेत. तर, डिलिव्हरी बॉयवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांवरही दैनंदिन निरीक्षण केले जात आहे. वाचा-कोरोनाच्या विळख्यामुळे कच्च्या तेलाने गाठला निच्चांक, किंमत आणखी उतरण्याची भीती दुसरीकडे देशातील कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आजपासून बऱ्याच भागातील लॉकडाऊनमध्येही सवलती सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कृषी क्षेत्र, लघु उद्योग, मनरेगा आणि बांधकाम यासारख्या महत्त्वपूर्ण कामांना सूट देण्यात येत आहे. हॉटस्पॉट भागात कोणत्याही प्रकारची सूट दिली जात नाही. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईच्या लॉकडाऊनमध्ये सवलती उपलब्ध नाहीत. प्रियांका गावडे-प्रियांका गावडे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या