राज्यात हवामानाचा पुन्हा यू-टर्न, 'या' भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात हवामानाचा पुन्हा यू-टर्न, 'या' भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

20 एप्रिल ते 26 एप्रिल विदर्भ, मराठवडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा स्कायमेटनं दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 एप्रिल : राज्यात कोरोना व्हायरसचं एकीकडे थैमान सुरू आहे. जवळपास 4 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत तर दुसरीकडे हवामानत होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट ओढवलं आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तर दुसरीकडे हवामात होणाऱ्या बदलामुळे शेतकरी आणि बागायतदार चिंतेत आहेत. 20 एप्रिल ते 26 एप्रिल विदर्भ, मराठवडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा इशारा स्कायमेटनं दिला आहे. तर काही भागांमध्ये हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. दुसरीकडे मुंबईसह अनेक शहरांमध्ये त्याच वेळी तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अकोला, जळगाव जिह्यात 40हून अधिक तापमान जाण्याची शक्यता आहे.

हे वाचा-रिलायन्स फाउंडेशनचे जगातील सर्वात मोठं मिशन, 3 कोटी लोकांना करणार अन्नदान

नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे येथेही पावसाचा स्कायमेटनं अंदाज वर्तवला आहे. या आठवड्याभरात संध्याकळच्या सुमारास राज्यातील वातावरण कोरडं राहिल. आसपासच्या राज्यात आर्द्रता कायम राहील आणि महाराष्ट्रातील बर्‍याच एकीकडे पाऊस होत होऊ शकतो तर दुसकीकडे तापमानात कमालीची वाढ होण्याची शक्यताही वर्तवली आहे.

सतत्यानं बदलत्या वातावरणामुळे आंबा, काजूसह इतर फळबागायतदारांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. कापलेली पिकं नीट ठेवण्याचं आवाहन स्काटमेटकडून करण्यात आलं आहे. अन्यथा पावसामुळे नुकसान होऊ शकतं.

हे वाचा-VIDEO : पुणे सीलबंद केल्यानंतर पोलिसांचं आक्रमक रूप, भर चौकात केली धुलाई

संपादन- क्रांती कानेटकर

First published: April 20, 2020, 1:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading