छत्तीसगड, 28 फेब्रुवारी : छत्तीसगडमधील बिलासपुरमध्ये शनिवारी एका तरुणीचं अपहरण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. धक्कादायक म्हणजे त्याच वेळी तरुणीच्या घरात तिच्याच लग्नाची तयारी सुरू होती. यादरम्यान दोन तरुणांनी तरुणीचं अपहण करुन पळ काढला. त्यानंतर गावात शोधाशोध सुरू झाली. अखेर त्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अटकेनंतर वेगळाच प्रकार समोर आला. हे पाहून पोलीलही चक्रावून गेले.
घरातून तरुणीचं अपहरण केल्यापासून ते पोलीस त्यांना पकडण्याच्या मधल्या काळात तरुण-तरुणी आर्य समाज मंदिरात लग्न करीत होते. दोघांच्या लग्नासाठी त्यांचा मित्रही साथ देत होता. महाराणा प्रताप नगरमधील एका तरुणीचं अपहरण झाल्याची माहिती पोलीस कंट्रोल रुमला मिळाली होती. दोन तरुणांनी तिचं अपहरण केल्याचं सांगण्यात आलं होतं. यासाठी पोलिसांनी नाकाबंदी करीत तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मोबाइल ट्रेस करुन या आरोपीला पकडण्यात आलं. सुरुवातील हाती लागलेल्या या तरुणाने माहिती देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांचा दणका पाहताच त्याने नेमका प्रकार सांगितला.
या तरुणीने सांगितल्याप्रमाणे पोलीस घटनास्थळी पोहोचले. तर अपहरण झालेली तरुणी आणि एका तरुणाचं लग्न सुरू होतं. हा प्रकार पाहून पोलिसांनीही धक्काच बसला.
हे ही वाचा-या' 20 आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांना 1 मार्चपासून मिळणार कोरोनाची लस, वाचा यादी
बिहारमधील या तरुणीचं तिच्या इच्छेविरोधात लग्न लावून दिलं जात होतं. मात्र तरुणीचं आधीचं प्रेमप्रकरण होतं, आणि याला तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्याकारणाने आपल्या लग्नाच्या दिवशी तरुणीने अपहरणाचा प्लान केला व प्रियकरासोबत मंदिरात लग्न केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marriage