मुंबई 01 मार्च : गेल्यावर्षी कोरोना (Corona Virus) महामारी जगभर पसरली आणि सामान्य माणसांचं जगणंच व्यापून टाकलं. या महामारीचा जागतिक आर्थिक स्थितीवर परिणाम झालाच पण त्याचा जगातील सर्व माणसांच्या मानसिकतेवरही विपरित परिणाम झाला. प्रत्येकानं कसाबसा तग धरला. कोरोनापूर्वी अगदी खंबीर मानसिकता असलेल्यांनाही या महामारीनं ग्रासलं आणि कमकुवत केलं. आर्थिक घडी बसवतानाच मानसिक आरोग्य चांगलं राखणंही महत्त्वाचं असल्याचं जगभरातील तज्ज्ञांनी सांगितलं. मग कुणी आपल्या जुन्या आवडी-छंद जोपासायला लागलं तर कुणी योगासनांचा आधार घेतला. या कठीण काळात तरून गेलेल्या सर्व जगभरातील आपल्या ग्राहकांसाठी आता गूगल या टेक जायंट कंपनीने पुढाकार घेतला आहे.
कोरानाची भीती अजून संपूर्ण गेलेली नाही. अशा काळात काय करावं आणि काय करू नये (Do’s and Don’ts) गुगलने जाहीर केले आहेत.
गूगल इंडियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक कारोसेल (Carousel) शेअर केला असून आपल्या ग्राहकांना कोरोनाबाबतची सावधानता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. जगातील सर्व नागरिकांना जोपर्यंत कोविड-19 ची लस मिळत नाही तोपर्यंत ही सावधानता बाळगणं गरजेचं आहे असं गुगलनी म्हटलं आहे. या क्रिएटिव्ह पोस्टमध्ये हे करा (Dos) आणि हे करू नका (Don’ts) असे दोन भागच करण्यात आले आहेत.
करा या विभागात फोटो आणि लोकांनी सामान्यपणे घ्यायची काळजी हे मुद्दे मांडले आहेत. सगळीकडे रंगीत ग्राफिक्सही वापरली आहेत. करा विभागात लोक घरी राहून कसं सुरक्षित राहू शकतात याबद्दल लिहिलंय यात प्रत्येकाने तोंडावर मास्क लाववा असं लिहिलंय तर समोर करू नका मध्ये तुम्हाला मास्क फिलिंग येणार नाही याची काळजी घ्या असंही म्हटलंय. करामधला मुद्दा आहे त्यात सोशल डिस्टन्सिंग पाळा असं सांगितलं आहे तिथंच गुगलनी प्रत्यक्ष जरी लोक दूर राहिले तरीही ते व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात राहू शकतात हे दाखवण्यात आलं आहे. जिथं वारंवार हात धुण्याची सूचना केली आहे तिथंच आपले छंद जोपासताना हात खराब होऊ शकतात अर्थात तुम्ही छंद जोपासायला हरकत नाही असा संदेश देण्यात आला आहे.
View this post on Instagram
या करा आणि करू नकामध्ये गुगलने चेहऱ्यावर नेहमी मास्कल लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, वारंवार साबणानी हात धुणं यासारखे नियम चित्रांच्या मदतीने मांडले आहेत.
दरम्यान, शनिवारी 27 फेब्रुवारी 2021 ला भारतात सलग तिसऱ्या दिवशी कोविड-19 चे 16 हजार रुग्ण सापडले. आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 1,10,79,979 झाली असून कोरोना आजारातून बरे झालेल्यांची संख्या 1,07,63,451 झाली आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. अधिकृत माहितीनुसार आतापर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाइन वर्करना कोरोना लसींचे 2,84,297 डोस देण्यात आले असून, भारतात 1.37 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. 16 जानेवारीला देशभरात कोरोना लसीकरणाचं अभियान सुरू झालं होतं.
गेले काही महिने कोरोना बाधितांची संख्या कमी झाली होती पण पुन्हा ती संख्या वाढत आहे. नागरिकांनी घरांतच रहावं आणि कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी सांगितलेली काळजी घ्यावी असं आवाहन सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Google, Safety