• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, राज्यपाल नियुक्तीचा विषय घातला मोदींच्या कानी!

अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक, राज्यपाल नियुक्तीचा विषय घातला मोदींच्या कानी!

गेल्या आठ महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारने याबद्दल यादी राज्यपालांना पाठवली आहे.

 • Share this:
  मुंबई, 08 जून : राज्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 12 मुद्यांवर आम्ही पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) यांच्यासोबत चर्चा केली. पण, राज्यात गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल (MLAs appointed by Governor)  नियुक्तीचा मुद्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान मोदींच्या कानी घातला. गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor bhagat singh koshyari) यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी आपल्याकडे राखून ठेवली असून त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदींच्या भेटीचे निमित्त साधून अजित पवार यांनी हा मुद्या सुद्धा पंतप्रधान मोदींच्या समोर मांडला. गेल्या आठ महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारने याबद्दल यादी राज्यपालांना पाठवली आहे. राज्यात सरकार हे बहुमतात आहे. तरीही याबद्दल निर्णय घेण्यात आला नाही. हायकोर्टात सुद्धा याबद्दल याचिका दाखल करण्यात आली आहे. सरकारकडून यादी राज्यपालांना दिली आहे, या आमदारांची नियुक्ती कशी करायची ही कायदेशीर बाब यात पूर्ण आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. पंतप्रधानांसोबत जवळपास दीड तास चर्चा झाली. स्थानिक स्वराज संस्थेच्या ओबीसी आरक्षण काढून टाकले आहे. त्यामुळे 56 हजार जागेवर परिणाम होत आहे. ओबीसीची जनगणना करावी. 50 टक्के ही मर्यादा काढून टाकावी, अशी मागणीही पवारांनी केली. या मुद्यांवर झाली पंतप्रधानांसोबत चर्चा 1- मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधानांसोबत चर्चा झाली असून यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. 2. काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय राजकारणातील आरक्षणाचा मुद्यावर चर्चा केली आहे. हा देशभरात गावपातळीवर महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यावर निर्णय घेण्याचे आश्वासन मोदींनी दिले. 3. मुंबईतील मेट्रो कारशेड  कांजूरमार्गला करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी हीच जागा योग्य असून ती द्यावी, अशी मागणीही केली. 4. जीएसटीचा परतावा मिळावा यासाठी मागणी केली 5. पिक विमामध्ये काही अटी शर्थी आहे, त्याबद्दल चर्चा केली आहे. बीड पॅटर्न सर्वात जास्त चर्चेत राहिला आहे, त्याबद्दल कल्पना दिलीय 6.  राज्यावर नेहमी निसर्ग चक्रीवादळ आणि तौक्ते चक्रीवादळ धडकून गेले. त्यामुळे नुकसान झाले. जी काही मदत दिली जाते त्याचे एनडीआरएफचे निकष बदलण्यात यावे. मागे आम्ही निकष बदलून मदत दिली. त्यात कायम स्वरूपी बदल करावे. 7. १४ व्या वित्त आयोगानुसार थकीत निधी देण्यात यावी अशी मागणी केली 8. मराठी भाषा दिनाला फक्त अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी वारंवार मागणी झाली. पण, मराठी भाषेला दर्जा द्यावा अशी मागणी आहे.
  Published by:sachin Salve
  First published: