नवी दिल्ली, 4 मार्च : गुजरातमध्ये आयेशा नावाच्या विवाहित महिलेनं साबरमती नदीच्या काठावर आपला व्हिडिओ बनवत लागलीच आत्महत्या केली. 25 फेब्रुवारीची ही घटना आहे. हा व्हिडिओ वेगानं व्हायरल झाला. लोकांनी तो सोशल मिडियावर शेअर करत प्रचंड हळहळ व्यक्त केली. (AIMIM Asaduddin Owaisi news)
पती आणि सासरच्यांनी हुंड्यासह इतर अनेक गोष्टींसाठी छळ केल्यानं आयेशा तणावात होती. त्यातून तिनं आत्महत्या केली असं समोर येत आहे. एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असलेल्या असदुद्दीन ओवेसींचा व्हिडिओही या प्रकरणात आता व्हायरल होतो आहे. (AIMIM Asaduddin Owaisi dowry speech)
वरिष्ठ पत्रकार स्मिता प्रकाश यांच्यासह अनेक लेखक, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. आयेशा प्रकरणाच्या निमित्तानं मुस्लिम समाज आणि एकूणच भारतीय समाजाला ओवेसी अतिशय तळमळीनं आवाहन करत आहेत. एका सभेत त्यांनी केल्या भाषणातल्या काही भागाची ही व्हिडिओ क्लिप आहे. (Asaduddin Owaisi dowry viral video)
या 2 मिनीट 19 सेकंदांच्या व्हिडिओत ओवेसी नेहमीप्रमाणेच अतिशय तर्कशुद्ध आणि स्पष्ट भूमिका घेताना दिसतात. ते म्हणतात, 'अहमदाबादमधल्या मुलीनं केलेल्या आत्महत्येचा अत्यंत वेदनादायी व्हिडिओ समोर आला आहे.
हेही वाचा हावभावांच्या बाबतीच मुलांनीच जॉनी लीव्हरला हरवलं, भन्नाट डान्सचा VIDEO VIRAL
मी सगळ्यांना आवाहन करतो, की तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, हुंड्याचा लोभ आपापल्या मनातून संपवा. तुम्ही खरोखर मर्द असाल, तर पत्नीवर अत्याचार करणं ही मर्दानगी नाही. पत्नीला मारणं हीसुद्धा मर्दानगी नाही. हे असं काही कराल तर तुम्ही मर्द म्हणवून घेण्याच्याच लायकीचे नाही. (Asaduddin Owaisi Ayesha suicide video clip)
Thank you for saying this @asadowaisi pic.twitter.com/CIHRZNwf2U
— Smita Prakash (@smitaprakash) March 3, 2021
पुढे त्यांनी मुस्लिम समाजाला विशेष आवाहन करताना म्हटलं, की आदरणीय प्रेषित पैगंबर मोहम्मद यांनीही हेच सांगितलं होतं, की तुमच्यापैकी सर्वोत्तम तोच आहे, जो आपल्या घरच्यांशी चांगला व्यवहार करेल. त्या निरागस मुलीवर अत्याचार केले गेले. तिनं पतीनं मारल्यावर इतकं मोठं पाऊल उचललं. लाज वाटली पाहिजे, अशा लोकांना जे मुलींवर अशी वेळ आणतात.' हे बोलताना ओवेसी अतिशय संतापले होते.
हेही वाचा ...म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली नाही; अखेर कारण आलं समोर
त्यांनी संतापलेल्या स्वरात सभेला विचारलं, 'कसे मर्द आहात तुम्ही सगळे? अजून किती मुलींचा बळी घेणार आहात तुम्ही? तुमच्यातली माणुसकी मेली आहे का? मला असे अनेक बाप माहीत आहेत, जे त्यांच्या अंतिम क्षणांमध्ये माझा हात पकडत मला म्हणतात, असद साहेब, माझ्या मुलीचं लग्न आहे, काही व्यवस्था करा ना...' शेवटी ओवेसी म्हणतात, की तुम्ही जगाला धोका देऊ शकता, अल्लाहला नाही. अल्लाह सगळं पाहतो आहे. जो पीडित आहे अल्लाह त्याच्याच बाजूनं आहे.
काय आहे आयेशाचं प्रकरण?
आयेशा केवळ 23 वर्षांची होती. पती आरिफ खान आणि सासरच्या लोकांनी तिचा विविध प्रकारे छळ केल्याचं कारण तिच्या आत्महत्येमागं असल्याचं वास्तव आता समोर येतं आहे. आरिफ राजस्थानच्या जालौरचा राहणारा असून त्यानं लग्नानंतर आयेशाला आपलं दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याचं स्पष्ट सांगितलं होतं.