...म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली नाही; अखेर कारण आलं समोर

...म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली नाही; अखेर कारण आलं समोर

कोरोना लसीकरण (Covid-19 Vaccination) सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली.

  • Share this:

मुंबई, 4 मार्च : 1 मार्च 2021 पासून सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण (Covid-19 Vaccination) सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मंत्र्यांनी कोरोनाची लस घेतली. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनीदेखील कोरोनाची लस टोचून घेतली. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र कोरोनाची लस घेण्याचं टाळलं. यामुळे मोठी चर्चा सुरू झाली होती. देशभरात कोरोनाचं लसीकरण केलं जात असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र लस घेण्यापासून दुरावा ठेवला. (CM Uddhav Thackray did not take corona vaccine)

अखेर त्यांनी लस टोचून न घेण्याचं कारण समोर आलं आहे. याबाबत सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री कोरोनाची लस न घेण्याबाबत म्हणाले की, अधिवेशन संपल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेण्यात येईल. हृदयावर शस्त्रक्रिया झाली असल्याकारणाने डॉक्टरांच्या सल्ल्याने लस घेईन, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा-Covaxin च्या अंतिम ट्रायलचा अहवाल जारी; लसीकरण सुरू असतानाच समोर आली मोठी माहिती

दरम्यान देशातील दोन राज्यांमध्ये कोरोना (Corona Virus) रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. याठिकाणची स्थिती चिंताजनक असून महाराष्ट्रातील बुधवारचा कोरोना रुग्णांचा आकडा (Corona Cases in Maharashtra) चिंतेत भर घालणारा आहे. बुधवारी महाराष्ट्रात ९८५५ तर केरळमध्ये २७०० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या पाहिल्यास ६० ते ७० टक्के रुग्ण केवळ या दोन राज्यांमधील आहेत. मात्र, राज्यातील स्थित आणखीच भयानक आहे (Maharashtra Coronavirus Latest Update). याच कारणामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आलं आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: March 4, 2021, 5:29 PM IST

ताज्या बातम्या