श्रीनगर, 12 मे : जम्मू काश्मीरमधील (Jammu-Kashmir News) बडगाममधील राजस्व विभागातील एका अधिकाऱ्याची गोळी घालून हत्या केल्याचं समोर आलं आहे. तहसीलदार कार्यालयातील राहुल भट्ट नावाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केली. राहुल यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राहुल हे काश्मिरी पंडीत असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते राजस्व विभागात काम करीत होते. मात्र गुरुवारी दहशतवाद्यांनी तहसीलदार कार्यालयात घुसून गोळीबार केला. यानंतर दहशतवादी घटनास्थळाहून फरार झाले. त्यांचा तपास सुरू आहे. सैन्यानेही या भागात सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. त्या दहशतवाद्यांना लवकरचा लवकर पकडण्यात यावे, यासाठी प्रयक्न सुरू आहेत.
या घटनेनंतर काँग्रेस नेत्यांनी सरकारवर हल्ला बोल सुरू केला आहे. काँग्रेस नेत्या अश्विनी हांडा म्हणाल्या, काश्मीर खोऱ्यात पंडितांची सुरक्षा केली जात नाही. गेल्या काही दिवसात अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.
तर काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात तातड़ीने कारवाई केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांचं काश्मीरमधील नेटवर्क उद्ध्वस्त केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये 10 तासांपर्यंत चकमक सुरू होती. यात लष्कर-ए-तैयबा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांची हत्या करण्यात आली. यापैकी एक पाकिस्तानचा राहणारा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jammu and kashmir, Jammu kashmir, Murder