मराठी बातम्या /बातम्या /देश /राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांची योगी सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले...

राहुल गांधींच्या भेटीनंतर संजय राऊतांची योगी सरकारवर जळजळीत टीका, म्हणाले...

लखीमपूर खेरीच्या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची गरज आहे अन्यथा हे लोक विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गाडी चढवू शकतात.

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : उत्तरप्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकरी आंदोलकांना ठार मारण्यात आलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतली आहे. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असून अन्यथा हे विरोधी पक्षांच्या नेत्यांवरही गाडी चढवू शकतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) प्रकरणानंतर संजय राऊत यांनी नवी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यांचीशी या प्रकरणावर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना या घटनेचा निषेध व्यक्त केला.

'लखीमपूर खेरीच्या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्ष एकत्र येण्याची गरज आहे अन्यथा हे लोक विरोधी पक्षाच्या नेत्यांवर गाडी चढवू शकतात. विरोधी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे',असं मत  संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

Oh no! उत्साहात मिठी मारणं पडलं महागात; कपलसोबत काय घडलं पाहा Video

राहुल गांधी यांच्यासोबत अनेक मुद्यांवर चर्चा झाली आहे. अनेक विषय आहे, त्यामुळे सगळ्यांबद्दल बोलू शकत नाही. काही विषय हे आमच्यात राहु द्या. लखीमपूरमध्ये जाण्याबाबत आमची चर्चा झाली आहे. शिष्ठमंडळ लवकरच तिथे भेट देणार आहे. त्याबद्दल माहिती दिली जाईल, पण, देशात आज लोकशाही उरली आहे का? लोकशाही व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे, असंही राऊत म्हणाले.

पियुष गोयल यांनी पवारांना भेट नाकारली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आज दुपारी नवी दिल्लीत वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी पवारांची भेट नाकारली असल्याचं समोर आलं आहे.

Explainer: बलात्कार झाला की नाही हे तपासण्यासाठी IAFमध्ये टू फिंगर टेस्टचा वापर?

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि यांची भेट ऐनवेळी नाकारली असल्याची बाब आता समोर आली आहे.  आज दुपारी पियूष गोयल आणि शरद पवार यांची नियोजित भेट होणार होती. पण, अचानक ही भेट नाकारण्यात आली.

भेट का नाकारली या संदर्भात कारण मिमासा नाही.पण, शरद पवार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतल्यामुळे तर ही भेट नाकारण्यात आली नाही ना? असे प्रश्न निर्माण झाली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन लखीमपूर घटनेचा निषेध व्यक्त केला होता. 'शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा निषेध करतो, या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, जे घडलं त्याची वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. शेतकऱ्यांचे आंदोलन शांततेत सुरू होते. शेतकऱ्यांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. उत्तरप्रदेश सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. जालियनवाला बाग हत्याकांडासारखीच परिस्थिती उत्तरप्रदेशात निर्माण झाली आहे' अशी जळजळीत टीका पवारांनी केली होती.

First published:
top videos