Home /News /national /

पतीने केलं दुसरं लग्न; पहिल्या पत्नीने संतापाच्या भरात घर जाळलं; 4 जणांचा होरपळून मृत्यू

पतीने केलं दुसरं लग्न; पहिल्या पत्नीने संतापाच्या भरात घर जाळलं; 4 जणांचा होरपळून मृत्यू

बिहार राज्यातील दरभंगा (Darbhanga) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे घरगुती वादातून पत्नीने स्वतःच्या घराला आग लावली. यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला.

  दरभंगा, 14 मे : बिहार राज्यातील दरभंगा (Darbhanga) येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे घरगुती वादातून पत्नीने स्वतःच्या घराला आग लावली. यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बिरौल ठाण्याच्या सुपौल बाजार भागातील आहे. नेमके काय घडले - मिळालेल्या माहितीनुसार, खुर्शीद आलम यांच्या दोन पत्नींमध्ये वाद झाला होता. या वादातून त्यांची पहिली पत्नी परवीन हिने शनिवारी पहाटे रागाच्या भरात घराला आग लावली. या आगीत आग लावणाऱ्या परवीनसह चौघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत गंभीर भाजलेल्या खुर्शीद आलम आणि त्यांची दुसरी पत्नी रोशनी खातून यांना उपचारासाठी दरभंगा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (डीएमसीएच) दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा - उल्हासनगरमध्ये दोघांची वृद्ध महिलेसह मुलाला जबर मारहाण; संतापजनक कारण समोर
  मेकॅनिकचे काम करणाऱ्या खुर्शीद आलमचे दहा वर्षांपूर्वी बीबी परवीनसोबत लग्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. पण अपत्य न झाल्याने खुर्शीद यांनी दोन वर्षांपूर्वी शेजारच्या गावातील रोशनी खातूनसोबत दुसरे लग्न केले. पतीच्या दुसऱ्या लग्नामुळे परवीन खूश नव्हती. ती याचा विरोध करत होती. तिने पती खुर्शीदला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही तिने दिला होता. या प्रकरणावरून खुर्शीद आलम यांच्या दोन्ही पत्नींमध्ये अनेकदा वाद झाले होते.
  या वादातून त्यांची पहिली पत्नी परवीन हिने शनिवारी पहाटे रागाच्या भरात घराला आग लावली. या आगीत आग लावणाऱ्या परवीनसह चौघांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत गंभीर भाजलेल्या खुर्शीद आलम आणि त्यांची दुसरी पत्नी रोशनी खातून यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

  व्हिडिओ कॉलवर कोणासोबत बोलतीये? प्रश्न विचारताच भडकली पत्नी

  पत्नी व्हिडिओ कॉलवर (Wife on Video Call) कुणाशीतरी बोलत होती. पतीने यावेळी पत्नी कुणीशी बोलते विचारले असता तिने पतीसोबत वाद (Husband Wife Dispute) घातला. इतकेच नव्हे तर पतीवर चाकून वार केले आहेत. या प्रकारानंतर जखमी झालेल्या पतीने खदान पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. यानंतर याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात घडली.

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bihar, Death, Fire

  पुढील बातम्या