नवी दिल्ली, 14 मे : ‘मी एक मुलगी आहे आणि मला मुलगी म्हणून जगायचं आहे. मला मुलगा म्हणून गाडी चालवायची नाही. माझ्या आई-वडिलांची सात मुली आहेत. मी चौथ्या क्रमांकावर होते. या समाजात मुलींची अशी दुर्दशा आहे की, माझ्याशी लग्न करून मला स्वतःच्या घरी नेणारा, मला दोन मुली असताना रात्री दोन वाजता घराबाहेर काढतो,’ अशी मन हेलावून टाकणारी कहाणी लक्ष्मी सांगते. त्यावेळी मला मुलगी होणं हा शाप वाटू लागला. पण मी हार मानली नाही. मी माझ्या दृष्टिकोनातून या समाजात राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुलीही काही करू शकतात, हा आरसा समाजाला दाखवावा लागतो. हे लक्ष्मीचे (वय 30) म्हणणं आहे. ती सध्या अवजड वाहन चालवण्याचे प्रशिक्षण (heavy motor training) घेत आहे. सध्या, लक्ष्मी बुरारी येथी ड्रायव्हर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, येथे हेवी मोटार वाहनाच्या प्रशिक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात आहे. ती सफाईदारपणे एका हाताने बसचं स्टेअरिंग सांभाळत असताना, दुसरा हात गिअरवर ठेवून बसचा वेग वाढवताना दिसते. काही दिवसांत लक्ष्मी दिल्लीच्या रस्त्यांवर बस किंवा ट्रक चालवताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको. लक्ष्मी सांगते की, मी एक चांगली ड्रायव्हर बनू शकेन, यासाठी मी इथे महिनाभर प्रशिक्षण घेत आहे. आता एकच परीक्षा उरली आहे. त्यानंतर मी बस आणि ट्रक चालवू शकते. मी एका वर्षापासून दिल्लीत टॅक्सी चालवत आहे. जेव्हा प्रशिक्षण सुरू होतं, तेव्हा मी पहाटे 3-4 वाजेपर्यंत टॅक्सी चालवायचे. नवभारत टाईम्सच्या माहितीनुसार, ही लक्ष्मीची कहाणी अनेकांना विचार करायला लावणारी आहे. हे वाचा - विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ! एकाच खोलीत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग; अन्.. ‘सासरच्या लोकांनी रात्री 2 वाजता मारहाण करून घराबाहेर काढलं’ लक्ष्मी म्हणते, ‘माझ्या आई-वडिलांना मुलगा हवा होता, तो मिळाला नाही. उलट देवाने त्यांना 7 मुली दिल्या. आठवीपर्यंत शिकल्यानंतर माझं लग्न झाल. लग्नानंतर मला पहिली मुलगी झाल्यापासून माझा पती आणि सासरच्या लोकांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. माझं दुसरं मूलदेखील मुलगीच होती. यावर रात्री 2 वाजता सासरच्या लोकांनी मला मारहाण करून घरातून हाकलून दिलं. मग मी ठरवलं की, मी कुटुंबाला आणि समाजाला आरसा दाखवेन आणि दाखवून देईन की, मुलीही खूप काही करू शकतात. हे वाचा - ‘‘आम्ही कोणाच्या रिमोट कंट्रोलनं…’’, Navneet Rana पुन्हा एकदा लाईमलाईटमध्ये घरखर्च चालवण्यासाठी धुणी-भांडीही केली लक्ष्मी सांगते की तिने घराघरांमध्ये भांडीही धुतली आहेत. यातून घरचा खर्च भागायचा. पण माझ्या कुटुंबात किंवा समाजात काहीही बदल होऊ शकला नाही. त्यासाठी मी गाडी चालवायला सुरुवात केली. आता मला स्वतःसाठी आणि माझ्या मुलींसाठी काहीतरी करायचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.