प्रवाशांनी गच्च भरलेली बस खोल दरीत कोसळली, 47 जणांचा मृत्यू

उत्तराखंडच्या पौडी गढवाल इथल्या नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावर एक बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2018 01:51 PM IST

प्रवाशांनी गच्च भरलेली बस खोल दरीत कोसळली, 47 जणांचा मृत्यू

उत्तराखंड, 01 जुलै : उत्तराखंडच्या पौडी गढवाल इथल्या नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावर एक बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 47 जणांचा मृत्यू झाला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस भौनहून रामनगरला जात होती. नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावरच्या ग्वीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस दरीत जाऊन कोसळली.

हेही वाचा...

गडचिरोलीत कार आणि प्रवासी वाहनाच्या धडकीत 7 जण ठार, 5 जखमी

रात्री दुकान बंद करून झोपले, सकाळी 11 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिले

Loading...

या भीषण अपघातात 47हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. बस 28 आसनी असून, रस्तावरून जवळपास 60 मीटर दरीत ती कोसळली आहे. या भीषण अपघातात मोठी जीवित हानी झालेली आहे.

यात अपघातात 20 मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. तर 12 जखमी प्रवाश्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याती शंका गढवालचे कमिश्नर दिलीप जवाळकर यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी बस दुर्घटनेतील मृतांसाठी दुःख व्यक्त केलं आहे. तर तातडीने घटनास्थळी मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. स्थानिक प्रशासन, पोलिस आणि एसडीआरएफ हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचा...

मध्य प्रदेशमध्ये 8 वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार, आमदार-खासदारांचं मात्र राजकारण

दिल्लीमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले 11 मृतदेह, सगळ्यांच्या डोळ्याला बांधली होती पट्टी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2018 12:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...