गडचिरोलीत कार आणि प्रवासी वाहनाच्या धडकीत 7 जण ठार, 5 जखमी

गडचिरोलीत कार आणि प्रवासी वाहनाच्या धडकीत 7 जण ठार, 5 जखमी

गडचिरोली कार आणि काळी पिवळ्या प्रवासी वाहनाच्या धडकीत झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यु झाला आहे.

  • Share this:

गडचिरोली, 01 जुलै : गडचिरोली कार आणि काळी पिवळ्या प्रवासी वाहनाच्या धडकीत झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यु झाला आहे. तर यात 5 जण जखमी झाले आहेत. यात मित्तलवार कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

चंद्रपुरहुन कालेश्वरला दर्शनासाठी गेलेल्या मित्तलवार कुटूंबाच्या गाडीला मोठा अपघात झाला. त्यात त्यांच्या कुटुंबातील 5 सदस्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. यात आई-वडिलांसह लहान मुलाचाही समावेश आहे.

रात्री दुकान बंद करून झोपले, सकाळी 11 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिले

आलापल्ली सिरोंचा मार्गावर गोवींदगाव फाटयावर हा भीषण अपघात झाला आहे. यात 5 जण जखमीही झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रविवारी देवदर्शनाला जाण्यासाठी निघालेल्या गाडीला अपघात झाला आणि त्यात 7 जणांना आपला प्राण गमवावा लागला. हा अपघात कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप समजलेलं नाही. पोलीस आता याचा तपास घेत आहेत.

दिल्लीमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले 11 मृतदेह, सगळ्यांच्या डोळ्याला बांधली होती पट्टी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2018 11:48 AM IST

ताज्या बातम्या