जाहिरात
मराठी बातम्या / देश / BREAKING : मध्य प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

BREAKING : मध्य प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू

ही बस हैदराबादहून लखनऊकडे जात होती. या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

ही बस हैदराबादहून लखनऊकडे जात होती. या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

ही बस हैदराबादहून लखनऊकडे जात होती. या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

  • -MIN READ Bhopal,Bhopal,Madhya Pradesh
  • Last Updated :

भोपाळ, 22 ऑक्टोबर : ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर मध्य प्रदेशमध्ये अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या रिवा इथं भीषण अपघात एकामागून एक तीन वाहनांची धडक झाली. बस आणि ट्रकच्या धडकेत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातात 40 हून अधिक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील रिवा इथं हा अपघात घडला आहे. ही बस हैदराबादहून लखनऊकडे जात होती. या बसमध्ये 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.

जाहिरात

अपघातात 12 जणांचा जागीच तर 2 जणांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. दिवाळसणानिमित्त सिकंदराबाद इथून प्रवासी लखनऊला त्यांच्या घरी जात होते. दरम्यान बस रिवाच्या सोहागी डोंगरावर पोहोचली, त्यावेळी चालकाचं बसवरील नियंत्रित सुटल्यानं ती ट्रकला धडकली आणि हा अपघात झाला. (वाशिममध्ये मोठी दुर्घटना; 40 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी बस पलटी ) या अपघातात 40 जण जखमी झाले आहे जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबद्दल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि रुग्णवाहिका पोहोचल्या असून मदतकार्य सुरू आहे. ( सुसाट एक्स्प्रेसचा लोखंडी पत्रा तुटला अन् स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशांवर उडाला, एक जण जखमी ) प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ब्रेक न लागल्यामुळे हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यात बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. अनेक प्रवाशी हे बसमध्ये अडकले आहे. या अपघातात अडकलेल्या प्रवाशांचे हात आणि पाय अक्षरश: तुटले असल्याची माहिती समोर आले आहे. जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी बस आणि ट्रक उभ्या आहेत. पण, अपघातात तिसरे वाहन हे घटनास्थळावरून फरार झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात