नवी दिल्ली/मुंबई, 23 मे: लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सोडल्या जात आहेत. देशातील विविध राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांसाठी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाने श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाचा अजब कारभारामुळे मजुरांचे हात होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात मुंबईहून मजुरांनी घेऊन निघालेली एक्स्प्रेस गोरखपूरऐवजी (उत्तर प्रदेश) ओडिशात पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हेही वाचा… महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला ड्रायव्हर्सला मार्ग माहीत नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेकडून यासंदर्भात अजूनही काही माहिती देण्यात आली नाही. श्रमिक विशेष रेल्वेगाडी मुंबईपासून जवळ असलेल्या वसई रोड रेल्वे स्टेशन येथून 21 मे रोजी गोरखपूरकडे निघाली होती. पण रेल्वेगाडी गोरखपूरऐवजी ओडिशातील राउरकेला स्टेशनवर पोहोचली. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मजूर मोठ्या संख्येने राऊळकेला स्टेशनवर अडकले आहे. मजुरांना अन्न-पाण्याविना उपासमारीची वेळ आली आहे. मजुर आगीतून निघून फपुट्यात पडल्यासारखी गत झाली आहे. पीडित मजुरांनी मदतीची मागणी केली आहे. राऊळकेला येथे अडकल्या मजुरांना गोरखपूरला नेण्यासाठी एक रेल्वे गाडी सोडण्यात यावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दुसरीकडे, देशभरातून या गाड्या जात असल्याने मध्य प्रदेशात जाणाऱ्या रेल्वेमार्गावर मोठी शुक्रवारी रेल्वेची ट्रॅफिक जाम झाली. यामुळे गुरुवारी रात्रीपासून इटारसीपासून भुसावळ विभागापर्यंत विविध मार्गावर रेल्वेगाड्यांना थांबवण्यात आले. काही गाडी स्थानकांवर, तर काही आऊटरला थांबल्या होत्या. यामुळे भुसावळ विभागात ठिकठिकाणी 30 रेल्वेगाड्या थांबल्या होत्या. 44 अंशांच्या तापमानात या गाड्यांमधील प्रवाशांचे जेवण-पाण्यावाचून प्रचंड हाल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हेही वाचा.. कोरोनाचा कहर! पोलिसांनीच पोलिसांसाठी सुरू केलं चालतं फिरतं ‘फीवर क्लिनिक’ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये जाणाऱ्या गाड्यांची संख्या शुक्रवारी अधिक होती. त्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. गुरुवारी रात्री इटारसीला पहिली रेल्वेगाडी थांबली, त्यामुळे या गाडीमागून जाणाऱ्या गाड्यांना इटारसी ते खंडव्यादरम्यान विविध रेल्वे स्थानकांवर थांबवण्यात आले. अशा प्रकारे गाड्यांची रांग वाढत गेल्याने, मिळेल, त्या स्थानकावर गाड्या थांबवल्या जात होत्या. प्रत्येक गाडीच्या डब्यात 52 प्रवासी असल्याने उन्हात या प्रवाशांचे हाल झाले. खंडवा, बऱ्हाणपूर, रावेर, भुसावळ, जळगाव आदी स्थानकांसह काही स्थानकांच्या आऊटरलाही गाड्या थांबवल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







