महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला

महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी, संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला

विधान परिषद निवडणुकीवरून शिवसेना विरुद्ध राज्यपाल असा सामना राज्यात रंगला होता.

  • Share this:

मुंबई, 23 मे : विधान परिषद निवडणुकीवरून शिवसेना विरुद्ध राज्यपाल असा सामना राज्यात रंगला होता. अखेर विधान परिषद निवडणूक बिनविरोध झाल्यामुळे हा वाद शमला. पण, आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत राजभवनवर दाखल झाले आहे. त्यांच्या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे.

गेले दोन महिने राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात चांगलीच जुंपल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

हेही वाचा -'हिजडा' शब्द भोवला! निलेश राणे यांच्याविरोधात तृतीयपंथीय आक्रमक, गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य बनवण्याचा प्रस्ताव असो नाहीतर कोरोना संदर्भात राज्यातील प्रमुख प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची राजभवनवर बैठक बोलवणं असो अशा अनेक मुद्यांवर संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं होतं. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी पदवी परिक्षांच्या निर्णयात हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत राज्यपालांच्या भेटीला पोहोचले आहे.  त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि   संजय राऊत यांच्यात काय चर्चा होतेय याबद्दल आता सर्वांनाच उत्सुक्ता निर्माण झाली आहे.

संपादन - सचिन साळवे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: governor
First Published: May 23, 2020 11:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading