नागपूर, 23 मे: राज्यात मुंबई, पुणे आणि औरंगाबाद पाठोपाठ नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. नागपुरात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 409 वर पोहोचली आहे. तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 298 आहे. हेही वाचा.. महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यातून सुरू झाली विमानसेवा, असा असेल प्रवासाचा मार्ग कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी दिवसरात्र डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ झटत असले तरी रस्त्यावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. कोरोनाचा विळख्यात पोलिस कर्मचारीही येऊ लागले आहे. त्यामुळे पोलिसांनीच पोलिसांसाठी फिवर क्लिनिक सुरू केलं आहे. नागपुरातही पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या तीन पोलिसांच्या संपर्कात आलेल्या इतर पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यामुळं पोलिस विभागाच्या वतीने खबरदारी म्हणून आणि प्रशासकीय यंत्रणेवर कामाचा अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी नागपूर पोलिसांनीच पोलिसांच्या आरोग्यासाठी चालतं फिरतं ‘फिवर क्लिनिक’ हा उपक्रम सुरू केला आहे. हेही वाचा.. ‘हिजडा’ शब्द भोवला! निलेश राणे यांच्याविरोधात तृतीयपंथीय आक्रमक, गुन्हा दाखल नागपूर शहरातील सर्व आठ हजार पोलिसांची आरोग्य तपासणी केली जात आहे. शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना कोरोनाची लक्षणं आहे का? हे तपासलं जातं आहे. लक्षणं आढळल्यास त्यांची कोरोना तपासणी करून पोलिस विभागाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येतं. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला तर पोलिस विभागानं सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार केले जात आहेत, अशी माहिती पोलिस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







