मथुरा, 24 फेब्रुवारी : यमुना एक्स्प्रेस वे (Yamuna Expressway) वर भीषण अपघाताचे सत्र सुरूच आहे. भरधाव वेगात असलेले डिझेल टँकर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेनं येणाऱ्या इनोव्हा गाडीवर उलटले. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. डिझेल टँकर (HR69-3433) हा आग्र्याहुन नोयडाकडे येत होता. यमुना एक्स्प्रेस वेवर अचानक चालकाने नियंत्रण सुटले आणि डिव्हायडर तोडून टँकर विरुद्ध मार्गावर आला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या इनोव्हा कार (HR 33D 0961) वर उलटला. टँकर इनोव्हावर उलटल्यामुळे कारमधील 7 जणांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, याच इनोव्हाचा चक्काचूर झाला.
....तर 'ग्रे लिस्ट'मधल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्ण कोसळेल
या अपघात इनोव्हामध्ये प्रवास करणारे मनोज, बबिता, अभय, कोमल, कल्लू, हिमाद्री आणि ड्राइव्हर राकेश यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जण सफीदों जींद येथील रहिवासी होते.
'स्त्री काही निर्जीव वस्तू नव्हे'; आंतरजातीय लग्नाबद्दल हायकोर्टाचा मोठा निर्णय
अपघाताची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, एक्स्प्रेस वेवरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. डीएम नवनीत चहल आणि एसएसपी गौरव ग्रोवर यांनीही घटनास्थळी धाव घेतली. कारमधील व्यक्तींना तातडीने बाहेर काढण्यात आले. डिझेल टँकर उलटल्यामुळे डिझेल महामार्गावर सांडले आहे, त्यामुळे कोणताही अपघात होऊ नये म्हणून महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.