Home /News /national /

'स्त्री म्हणजे काही जनावर किंवा निर्जीव वस्तू नव्हे'; आंतरजातीय लग्नाबद्दल हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

'स्त्री म्हणजे काही जनावर किंवा निर्जीव वस्तू नव्हे'; आंतरजातीय लग्नाबद्दल हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Inter Caste Marriage बद्दल हिमाचल प्रदेश हायकोर्टाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देऊन प्रेमी युगुलांना दिलासा दिला आहे.

    शिमला, 24 फेब्रुवारी : भारतीय  समाजात आजही आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर विरोध केला जातो. अगदी अशा जोडप्यांचा छळ करणं, त्यांना जीवे मारणं अशाही घटना घडतात. मात्र हिमाचल प्रदेश हायकोर्टानं याबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. एका उच्चजातीय (रजपूत) महिलेनं (upper caste woman) खालच्या जातीतील पुरुषाशी विवाह (lower caste man) करण्यासंदर्भात एक याचिका (petition) हायकोर्टाकडे सुनावणीसाठी आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना जस्टिस विवेक सिंग ठाकूर (justice Vivek Singh Thakur) यांच्या पीठानं (bench) हा निर्णय दिला. याचिकाकर्ता असलेल्या संजीव कुमार (Sanjeev Kumar) यानं कोमल परमार (Komal Parmar) हिच्याबाबत एक याचिका दाखल केली होती. यात त्यानं म्हटलं होतं, की कोमल परमार हिला प्रतिवादी क्र. 3,  तिचं कुटुंब (family) आणि नातेवाईकांनी (relatives) तिच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेतलं (abducted and detained) आहे जेणेकरून याचिकाकर्त्याशी होणारा तिचा विवाह (marriage) रोखला जावा. पुढं हेसुद्धा म्हटलं होतं, की कोमलचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या मते याचिकाकर्ता खालच्या जातीचा (lower caste) असल्यानं त्यातूनच कोमल परमार हिचं अपहरण करत या लोकांनी तिला बेकायदेशीररीत्या कोंडून ठेवलं आहे. शबनमची फाशी पुन्हा टळली; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला होणार होती शिक्षा याचिकाकर्त्यानं कोमल परमारला कोर्टापुढं आणलं जावं आणि त्याच्या स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षा पुरवली जावी कारण त्यांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका आहे अशीही विनंती केली. कोमलला कोर्टापुढं हजर केलं असता तिनं तिच्या अपहरणाच्या आरोपाला दुजोरा दिला. सोबतच तिचा तिच्या कुटुंबीय नातेवाईक आणि ग्रामस्थांनी छळ केल्याचंही सांगितलं. याप्रकरणाबाबत सुनावणी करताना हायकोर्टानं म्हटलं, 'आपण संविधानानं चालवलेल्या राज्यात (state governed by constitution)  राहतो. आणि जातीचे निकष लावून कुणाच्या जोडीदार निवडण्याच्या हक्कावर (right to choose spouse) बाधा आणली जात असेल तर ते अतिशय गैर आहे. हा भारतीय संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकारांचा भंग (violation of fundamental rights) आहे.' हायकोर्टानं पुढं भारतीय संस्कृतीतल्या प्राचीन काळाचा उल्लेख करत म्हटलं, की त्या काळातही आंतरजातीय विवाह होत असत. सती आणि भगवान शंकर, रुक्मिणी आणि भगवान कृष्ण (Rukmini and lord Krishna) यांच्या विवाहाचा दाखला कोर्टानं दिला. Ex Boyfriendनं भरगच्च बसमध्ये महिलेवर 30 वेळा चाकूनं केले सपासप वार, प्रवासी बघ्याच्या भूमिकेत  भारतात स्त्रीचं स्थान कायमच एक स्वतंत्र आणि समान हक्क (independent and equal) असलेली व्यक्ती असं राहिलेलं आहे. स्त्री म्हणजे काय कुठलं मुकं जनावर नाही. भारतीय संविधानानं आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा हक्क हा कायमच महत्त्वाचा हक्क मानलेला आहे. या प्रकरणातही कोमल ही सज्ञान (major) आहे. ती तिच्या स्वतःबाबत योग्य वाटेल तो निर्णय घेऊ शकते. कोमलने कोर्टाला सांगितलं, की आता तिची आपल्या अपालकांसह राहण्याची इच्छा नाही. मात्र तिला त्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळे त्यांच्याविरुद्ध कुठलीही तक्रार करायची नाही. आपण आता संजीव कुमार याच्या बहिणीसोबत, पूजा देवी हिच्यासोबत हिमाचल प्रदेश येथील जालरी गावी राहू इच्छितो असं कोमलने कोर्टापुढं सांगितलं. हेही वाचा शबनमची फाशी पुन्हा टळली; देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेला होणार होती शिक्षा त्यानुसार कोर्टानं तिला गरजेचं संरक्षण पुरवण्याचे आदेश शिमला आणि हमीरपूर पोलिसांना दिले. तिला हव्या त्या ठिकाणी जाईपर्यंत पोलीस संरक्षण पुरवण्यास हायकोर्टानं सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Case in india, Crime, High Court, Himachal pradesh, Marriage, Woman harasment

    पुढील बातम्या