झुंझुनू, 26 नोव्हेंबर: एकाच दिवशी एकाच वेळी सहा सख्ख्या बहिणींनी लग्नगाठ बांधल्याची (6 sisters marriage) अनोखी घटना समोर आली आहे. स्कुलबस चालक पित्याने अत्यंत सन्मानपूर्वक पद्धतीनं आपल्या मुलींना सासरी पाठवलं आहे. तत्पूर्वी त्यांनी आपल्या सहाही मुलींची एकाच वेळी घोड्यावरून वरात देखील काढली आहे. एकाच दिवशी सहा बहिणींचं अनोख्या पद्धतीनं लग्न (unique marriage) झाल्याने गावात सर्वत्र जल्लोषाचं वातावरण होतं. या सहा बहिणींचं एकाच वेळी लग्न झालं असून तीन गावातून वराती आल्या होत्या.
ही अनोखी लग्नाची घटना राजस्थानातील (rajasthan) झुंझनू जिल्ह्याच्या खेतडी तालुक्यातील चिरानी गावातील आहे. येथील रहिवासी असणारे रोहिताश्व यांना एकूण सात मुली आणि एक मुलगा आहे. रोहिताश्व हे स्कुलबस चालक असून त्यांनी आपल्या सहा मुलींचं एकत्रित लग्न केलं आहे. सहा मुलींचं एकत्र लग्न केलं असलं तरी, तरी त्यांनी लग्नात कोणतीही उणीव ठेवली नाही. त्यांनी आपल्या सहा मुलींची एकाच वेळी घोड्यावरून वरात काढली आहे.
हेही वाचा-माणसाला बिलगुन हुंदके देत रडू लागली कोंबडी; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावुक
या लग्नात केवळ हे कुटुंबच नाही तर संपूर्ण गाव सहभागी झालं होतं. सहा सख्ख्या बहिणींचं एकत्रित लग्न पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं. तर अनेक लोकांना आनंद देखील झाला. निरोप घेताना घरातील सदस्यही भावुक झाले. कारण सहा मुली एकाच वेळी सासरी गेल्याने बापाचं अंगण एकदम सुनसान झालं होतं.
हेही वाचा-'पोपट शोधा आणि मिळवा 15 हजार', इंजिनिअरची जाहिरात; घरोघरी वाटली पत्रकं
मुलगा विकास गुर्जर यांनी सांगितलं की, त्याचे वडील स्कूल बस चालवतात. पण त्यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणात कधीही कसर सोडली नाही. त्यांची बहीण मीना आणि सीमा यांनी एमए बीएड केलं आहे. तर अंजू आणि निक्की या दोघींनी एमएम केलं आहे. तर योगिता आणि संगीता यांनीही बी.एस्सी. उत्तीर्ण असून सर्वात धाकटी बहीण कृपा तिचं अजून लग्न झालेलं नाही. तिनेही B.Sc पूर्ण केलं आहे. सर्वच मुली अभ्यासात हुशार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rajasthan