मराठी बातम्या /बातम्या /Viral /माणसाला बिलगुन हुंदके देत रडू लागली कोंबडी; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावुक

माणसाला बिलगुन हुंदके देत रडू लागली कोंबडी; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावुक

कितीही आवडीने चिकन खात असलात तरी कोंबडीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

कितीही आवडीने चिकन खात असलात तरी कोंबडीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

कितीही आवडीने चिकन खात असलात तरी कोंबडीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

मुंबई, 26 नोव्हेंबर : संकट ओढावताच कोंबड्यांना (Chicken video) मोठ्याने आवाज करताना, पंख उडवत, हवेत उडत फडफडताना तुम्ही पाहिलं असेल. पण कधी कोंबड्यांना रडताना पाहिलं आहे का? (Chicken crying video) सध्या अशाच एका रडणाऱ्या कोंबडीचा (Crying chicken video) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. तुम्ही कितीही आवडीने चिकन खात असलात तरी कोंबडीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर टर्की चिकनचा (Turkey Chicken video) हा व्हिडीओ आहे. टर्की ही कोंबड्यांची एक प्रजात आहे. ही कोंबडी एका व्यक्तीला बिलगुन हुंदके देत रडताना दिसली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स इमोशनल झालेत (Emotional video).  एका व्यक्तीच्या मांडीवर आपल्या डोकं ठेवून आहे. तिने आपले डोळे झाकलेले आहेत. पण ती थोडे थरथरते आहे, तिच्या तोंडातून हलकासा आवाजही येतो आहे.

ही कोंबडी कशाला तरी घाबरलेली आहे. भीतीने ती या व्यक्तीला बिलगली आणि डोळे बंद करून ती हुंदके देते आहे. कोंबडीला पाहून ती रडतेच आहे असं वाटतं.

हे वाचा - OMG! DJ च्या आवाजामुळे कोंबड्यांना आला Heart attack; 63 Chickens दगावल्या

एखादं मूल आईच्या कुशीत विसावल्यानंतर आईच्या पदराखाली आपण जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणी असल्याचं त्याला वाटतं, तसंच या कोंबडीलाही कदाचित वाटत असावं. ज्या व्यक्तीच्या मांडीत ती शांतपणे विसावली आहे ती व्यक्तीसुद्धा या कोंबडीच्या डोक्यावरून मायेने हळुवारपणे हात फिरवताना दिसते आहे. घाबरलेल्या कोंबडीला ती धीर देते आहे.

@JohnOberg नावाच्या ट्विटर युझरने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. जर कुणी थँक्स गिव्हिंगदरम्यान टर्की चिकन खाण्याचा बेत आखत असेल तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपली प्लेट सोडून देईल.  जॉन ओबेर्गचा शेअर केलेला हा व्हिडीओ अवघ्या काही सेकंदाचाच आहे. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर फक्त प्राणी प्रेमी, व्हेजिटेरिअन लोकच नाही तर नॉन व्हेजिटेरिअनही भावुक झाले.

हे वाचा - दगड समजून चक्क मगरीवरून चालली कोंबडी; तोंडाजवळ येताच... VIDEO पाहून तुम्ही उडाल

याआधी सांगलीतील एका कोंबडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. एका चिकन दुकानात चक्क कोंबडीच 'मला कापू नका' असे म्हणत मुंडी हलवून सांगताना दिसली.  दुकान मालकाने सुरा हातात घेऊन 'तुझे कापू क्या..' असं म्हणताच कोंबडी जोरजोरात मुंडी हलवते. दुकानमालक पुन्हा तुझे कापू क्या असं विचारतो आणि परत कोंबडी तसंच करते. शेवटी दुकानमालकाने ही कोंबडी कापली नाही.

First published:

Tags: Chicken, Viral, Viral videos