मराठी बातम्या /बातम्या /देश /20 लाख बक्षीस, 93 गुन्हे दाखल असलेल्या 6 जहाल माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण

20 लाख बक्षीस, 93 गुन्हे दाखल असलेल्या 6 जहाल माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण

 चिन्ना या माओवाद्यावर खून, चकमकीसह 93 गुन्हे दाखल आहेत. तर वंथला वन्नु या एरिया कमेटी कमांडरचाही समावेश असून त्यावर 25 गुन्हे दाखल आहेत.

चिन्ना या माओवाद्यावर खून, चकमकीसह 93 गुन्हे दाखल आहेत. तर वंथला वन्नु या एरिया कमेटी कमांडरचाही समावेश असून त्यावर 25 गुन्हे दाखल आहेत.

चिन्ना या माओवाद्यावर खून, चकमकीसह 93 गुन्हे दाखल आहेत. तर वंथला वन्नु या एरिया कमेटी कमांडरचाही समावेश असून त्यावर 25 गुन्हे दाखल आहेत.

गडचिरोली, 12 ऑगस्ट :  दंडकारण्यात हिंसक कारवाया करणाऱ्या 20 लाख रुपये बक्षीस असलेल्या 6 जहाल माओवाद्यांनी आंध्रप्रदेश पोलिसापुढे आत्मसमर्पण (maoist surrender) केलं आहे. या माओवाद्यांमध्ये चिक्कुडू चिन्ना (chikkudu china maoist) या जहाल माओवाद्याचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याची तिसरी घटना आहे.

देशभरातल्या माओवादप्रभावीत भागात माओवाद्यांचा (maoist) शहीद सप्ताह सुरू आहे. माओवादीग्रस्त भागात गेल्या अनेक वर्षांपासून दहशत माजवणाऱ्या 06 माओवाद्यांनी अखेर शस्त्र खाली टाकली आहे. आज एकूण 6 माओवाद्यांनी आंध्र प्रदेश पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. या माओवाद्यांमध्ये चिक्कुडू चिन्ना या जहाल माओवाद्याचा समावेश आहे.  चिन्ना या माओवाद्यावर खून, चकमकीसह 93 गुन्हे दाखल आहेत. तर वंथला वन्नु या एरिया कमेटी कमांडरचाही समावेश असून त्यावर 25 गुन्हे दाखल आहेत. याशिवाय इतर आत्मसमर्पित माओवाद्यांवर हत्या, जाळपोळीसह पोलिसांवर हल्ल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहे.  या सहा माओवाद्यांनी आंध्रप्रदेशच्या पोलीस महासंचालकासमोर आत्मसमर्पण केले असून माओवाद्याच्या  आत्मसमर्पणामुळे दंडकारण्यात माओवादी चळवळीला हादरा बसला आहे.

IND VS ENG : 'तरी हंगामा होणार नाही', रहाणे-पुजाराला गावसकरांचा पाठिंबा

याआधी 30 जुलै रोजी गडचिरोलीत (gadchiroli)  या शहीद सप्ताहात आज 8 लाख रुपये बक्षीस असलेल्या 2 जहाल माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर (gadchiroli police) आत्मसमर्पण केले आहे. हे दोघेही पती-पत्नी ( Maoist couple) आहेत. माओवादी दाम्पत्यामध्ये विनोद ऊर्फ मनिराम नरसु बोगा तसंच त्याची पत्नी कविता ऊर्फ सत्तो हरीसिंग कोवाची या दोघांचा समावेश आहे.

लष्करभरतीसाठी या देशात महिलांना द्यावी लागायची कौमार्य चाचणी, कशी थांबवली प्रथा?

यात विनोद उर्फ मनीराम नरसु बोगा हा कोरची तालुक्यात ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या बोटेझरी येथील रहिवासी आहे. विनोद बोगा दहा वर्षापूर्वी माओवादी चळवळीत दाखल झाला होता. सध्या विनोद कोरची दलममध्ये एरिया कमेटी मेम्बर (एसीएम) पदावर दलम डॉक्टर म्हणून कार्यरत होता. त्याची पत्नी कविता कोवाची ही पार्टी मेंबर या पदावर टिपागड दलममध्ये कार्यरत होती. विनोद बोगा (vinod boga) याच्यावर खूनाचे 13, चकमकीचे 21, जाळपोळ 01 व इतर 05 असे गुन्हे दाखल आहे. तर पत्नी कविता हिचेवर चकमकीचे 05, जाळपोळ 01 व इतर 03 असे गुन्हे दाखल आहेत. पोलीस दलाच्या विरोधात झालेल्या अनेक चकमकीच्या घटनामध्ये विनोदचा प्रत्यक्ष सहभाग होता, अशी माहिती पुढे आली आहे. सरकारने  विनोद बोगा याच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस ठेवले तर कविता कोवाची हिच्यावर ०२ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. ऐन शहीद सप्ताह सुरू असताना या माओवादी दाम्पत्यांनी आत्मसमर्पण केलं. गेल्या दोन वर्षात 49 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

First published: