मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND VS ENG : 'तरी हंगामा होणार नाही', संघर्ष करणाऱ्या रहाणे-पुजाराला गावसकरांचा पाठिंबा

IND VS ENG : 'तरी हंगामा होणार नाही', संघर्ष करणाऱ्या रहाणे-पुजाराला गावसकरांचा पाठिंबा

पुजारा-रहाणेला गावसकरांचा पाठिंबा

पुजारा-रहाणेला गावसकरांचा पाठिंबा

टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या खराब फॉर्ममध्ये आहेत. पण टीम इंडियाचे महान खेळाडू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मात्र रहाणे आणि पुजाराला पाठिंबा दिला आहे.

लंडन, 13 ऑगस्ट : टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या खराब फॉर्ममध्ये आहेत. मागच्या एका वर्षात या दोघांना मोठा स्कोअर करता आलेला नाही, ज्यामुळे त्यांच्या टीममधल्या स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. भारतीय टेस्ट टीममधले महत्त्वाचे खेळाडू असलेल्या या दोघांना आता टीममधून बाहेर काढण्याचीही मागणी होऊ लागली आहे, पण टीम इंडियाचे महान खेळाडू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मात्र रहाणे आणि पुजाराला पाठिंबा दिला आहे. फक्त रहाणे आणि पुजाराच नाही तर दुसरे बॅट्समनही अपयशी ठरले आहेत, असं स्पष्ट मत गावसकरांनी मांडलं आहे.

सोनी स्पोर्ट्ससोबत बोलताना गावसकर म्हणाले, 'हे दोन्ही खेळाडू लो प्रोफाईल आहेत, म्हणून त्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जर त्यांना टीममधून बाहेर केलं तरीही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (WTC Final) रहाणेने भारताकडून सर्वाधिक 49 रन केले, दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला रन करता आले नाहीत. या खेळाडूंबाबतच प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण ते दोघंही लो प्रोफाईल आहेत, त्यांना बाहेर केलं तरी कोणी हंगामा करणार नाही.'

मेलबर्न टेस्टमध्ये केलेल्या शतकानंतर रहाणेला मोठा स्कोअर करता आला नाही. मागच्या 15 इनिंगमध्ये रहाणेला फक्त एक अर्धशतक करता आलं आहे. रहाणेचं अखेरचं अर्धशतक इंग्लंडविरुद्ध चेन्नईमध्ये झालं होतं. मागच्या 8 इनिंगमध्ये त्याला अर्धशतकही करता आलेलं नाही.

'रहाणेने रन केले नाहीत हा चिंतेचा विषय आहे, पण त्यापेक्षा जास्त चिंतेची गोष्ट त्याच्या तंत्रातल्या चुका आहेत. पुजाराच्या बाबतीतही तेच आहे. रहाणे आऊट स्विंग बॉलवर आऊट होत आहे, पण यावर काम कोण करत आहे? फक्त पुजाराच नाही तिकडे सपोर्ट स्टाफही आहे. जर तुम्ही एकाच पद्धतीने वारंवार आऊट होत असाल, तर तुमच्या तंत्रात काहीतरी कमी आहे, पण तिकडे अशीही लोकं आहेत, ज्यांनी त्यांची मदत केली पाहिजे,' असं वक्तव्य गावसकरांनी केलं.

रहाणे आणि पुजाराला मागच्या 10 टेस्ट इनिंगमध्ये एकही अर्धशतक करता आलेलं नाही. 2020 पासून पुजारा, रहाणे आणि विराटची (Virat Kohli) सरासरी 30 पेक्षा कमी आहे. पुजाराने 13 टेस्टच्या 23 इनिंगमध्ये 25.09 च्या सरासरीने 552 रन केले, तर रहाणेने मागच्या 13 टेस्टच्या 22 इनिंगमध्ये 25.76 च्या सरासरीने 541 रन बनवले. विराटला मागच्या 10 टेस्टच्या 16 इनिंगमध्ये 24.19 च्या सरासरीने 387 रन करता आले.

First published:

Tags: Ajinkya rahane, India vs england, Pujara, Sunil gavaskar