जाहिरात
मराठी बातम्या / देश / Electric shock लागून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांनी गमावला जीव

Electric shock लागून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांनी गमावला जीव

Electric shock लागून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू; एकाला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांनी गमावला जीव

एक अत्यंत दुर्देवी घटना समोर आली आहे. या घटनेत विजेचा शॉक (Electric Shock) लागल्यानं एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला (6 Family Member’s Dies of Electrocution) आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ 11 जुलै: एक अत्यंत दुर्देवी घटना समोर आली आहे. या घटनेत विजेचा शॉक (Electric Shock) लागल्यानं एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला (6 Family Member’s Dies of Electrocution) आहे. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) छतरपूर जिल्ह्यातील बिजावर येथे रविवारी सकाळी ही घटना घडली आहे. येथील महुआझाला कॉलनीत टँक खोलण्यासाठी घरातील एक सदस्य टँकमध्ये उतरला होता. त्याठिकाणी अंधार असल्यानं लाईटची व्यवस्था केली गेली होती. याचाच करंट या व्यक्तीला लागला. पतीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडली बायको; लग्नानंतर काही दिवसात झाला खुलासा अन्.. विजेचा शॉक लागलेल्या व्यक्ती जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून घरातील दुसरा एक सदस्यदेखील टँकमध्ये उतरला. यानंतर एक-एक करून पाच लोक टँकमध्ये या व्यक्तीला वाचवण्यासाठी उतरले. टँकमधील पाणी बाहेर काढण्याासाठी याठिकाणी लाईटची व्यवस्था केली गेली होती. या घटनेची माहिती मिळताच मुकेश ठाकूर आणि पोलीस दल घटनास्थळी दाखल झालं. श्रीदेवीची दुसरी मुलगीही चर्चेत; ग्लॅमरस अवतार देतोय बॉलिवूड तारकांना टक्कर काहीच वेळात या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर डॉक्टरांनी या सहा जणांना मृत घोषित केलं. लक्ष्मण अहिरवार पुत्र रमुआ (वय 55), शंकर अहिरवार पुत्र हल्ली अहिरवार (वय 35) , मिलन अहिरवार पुत्र हल्लू (वय 25), नरेंद्र पिता जगन अहिरवार (वय 20), रामप्रसाद पुत्र हल्ली अहिरवार( वय 30) ,विजय पुत्र जगन अहिरवार (वय 20) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुर्देवी घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे, हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्धवस्त झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात