चंदीगड 07 ऑगस्ट : हरियाणातील पानिपत जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या पाटणा जिल्ह्यातून लग्नासाठी आलेल्या 5 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पानिपतच्या ऐतिहासिक देवी मंदिरातून ताब्यात घेतलं आहे. यामध्ये 3 मुली आणि 2 मुलांचा समावेश आहे. पानिपत शहर पोलीस स्टेशनला देवी मंदिरातून माहिती मिळाली की 5 मुले आली आहेत. ज्यामधील 4 अल्पवयीन मुले लग्नाच्या तयारीत आहेत. यानंतर पोलिसांनी तिथे पोहोचत फक्त लग्नच थांबवलं नाही, तर पाचही जणांना आपल्यासोबत ठाण्यात नेलं. त्यांच्या प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना बाल कल्याण विभागाच्या (सीडब्ल्यूसी) ताब्यात दिलं. CWC ने मुलांची चौकशी केली तेव्हा दोन मुली 15 ते 16 वर्षे वयोगटातील आढळल्या, तर एक किशोर 13 वर्षांचा असल्याचं आढळून आलं. तर, 17 ते 18 वयोगटातील दोन किशोरवयीन मुलंही यात होती. Fraud News: फोन अनलॉक करून ‘या’ व्यक्तीनं कमवले कोट्यवधी डॉलर्स, ऐकून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित ही माहिती देताना CWC मुकेश आर्य म्हणाले की, बिहारच्या पाटणा जिल्ह्यात पाच मुलांच्या अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की, समुपदेशनादरम्यान मुलांनी अनेक फिल्मी गोष्टी सांगितल्या. घराचा पत्ता लपवण्यासाठी अनेक खोटंही बोलली. मात्र, खोलवर विचारणा केली असता, ही पाच मुले लग्नाच्या उद्देशाने पाटण्याहून पानिपतला पोहोचल्याचे समजलं. यापैकी 2 मुली 8वी मध्ये शिकतात आणि तिसरी मुलगी आणि 2 मुले 10वी मध्ये शिकतात. माहिती देताना CWC सदस्य मुकेश आर्य यांनी सांगितलं की, या पाच मुलांना पानिपतच्या भोलारामने राहण्याची सोय केली होती, तोदेखील अल्पवयीन आहे. त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचवेळी त्यांनी सांगितलं की, मुलांची चौकशी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी तसंच बिहार पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर बिहार पोलिसांनी पानिपत शहर पोलीस स्टेशन गाठलं आणि कागदपत्रांची पूर्तता करून पाचही मुलांना बिहार पोलिसांच्या ताब्यात दिलं. Shocking! भरमंडपात केस खेचून फरफटत नेलं, लाथाबुक्क्यांनी तुडवलं; लग्नात नवरदेवाने घेतला नवरीचा जीव बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील गांधी मैदान पोलीस ठाण्यातून आलेल्या एएसआय कुसुम कुमारी यांनी माहिती देताना सांगितलं की, पोलीस ठाण्यात मुलांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. त्यांना पानिपतच्या शहर पोलीस स्टेशनकडून माहिती मिळाली की मुले तिकडे पोहोचली आहेत, टीमने मुलांची चौकशी केली असून आता त्यांना बिहारला नेण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







